
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी- संतोष मनधरणे
देगलूर;आज देगलूर येथील विद्यानिकेतन प्राथमिक शाळेमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ जयंती मोठ्या उत्सवांमध्ये साजरी करण्यात आली
शाळेचे मुख्याध्यापक शेख सर यांनी जिजाऊ प्रतिमेला पुष्पहार घालून दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात केलीत् यावेळी मुलींनी जिजाऊ बनवून शाळेमध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर आपापले मत व्यक्त
केले शाळेचे लेझीम पथक व जिजाऊ बनून आलेल्या मुलींनी शाळेच्या परिसरामध्ये प्रभात फेरी काढून जिजाऊ यांच्या नावाचा जयघोष करत पथसंचलन केले त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक शेख सह शिक्षक संतोष मंनधरणे सर अजगरे सर देगलूरकर सर मोरे सर माने मॅडम जाधव मॅडम आदी शिक्षक वर्ग व पालक वर्ग उपस्थित होते