
दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
केंद्रिय मानवाधिकार संघटना नवी दिल्ली आणि प्रांत ग्राहक संरक्षण समिती परीषद यांच्या संयुक्त विद्यमाने स्वराज जननी राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सौ संगीताताई दिपक नेत्रगावे यांना उत्कृष्ट उद्योजक म्हणून सन्मानीत करण्यात आले
यावेळी मानवाधिकार संघटनेचे महासचिव गायकवाड शिलरत्न तसेच प्रांत ग्राहक संरक्षण समिती चे जिल्हा उपाध्यक्ष संतोषभाऊ बिरादार तसेच आखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रदीप पाटील खंडापूरकर राष्ट्रवादी काँग्रेसचे सिध्दार्थ शिंदे आणि सार्थक विद्यालयातील शिक्षक मुख्याध्यापक उपस्थित होते
यावेळी आजची स्त्री सामर्थ्यवान व बुद्धीवान झाली आहे
पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आजची स्त्री कार्य करत आहे आणि म्हणूनच आज यांचे औचित्य साधून सौ संगीताताई दिपक नेत्रगावे यांना उत्कृष्ट उद्योजक म्हणून सन्मानीत करण्यात आले आसे गौरव उदगार गायकवाड शिलरत्न नवनाथ यांनी आपल्या भाषणात म्हणाले