
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती:-जिल्हा परिषदेमधील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी जिल्हास्तरीय क्रीडा सांस्कृतिक महोत्सवाचे १३ ते १५ जानेवारी दरम्यान शहरातील श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ येथे आयोजित करण्यात आला आहे.या क्रीडा महोत्सवात १४ पंचायत समितीचे संघ,अधिकारी व मुख्यालय अमरावती असे एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत.जिल्हाभरातील २५०० अधिकारी व कर्मचारी यामध्ये सहभागी होतील.सामाजिक दायित्व म्हणून रविवार दिनांक १५ जानेवारी रोजी सकाळी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. त्यात सहभागी होण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आलेले आहे.
—————————————-
या खेळांचा समावेश
खेळांमध्ये क्रिकेट,फुटबॉल,हॉलीबॉल,कबड्डी,खोखो,टेनीक्वाईट,बॅडमिंटन,टेनिस,कॅरम,बुद्धिबळ,जलतरण १००,२००,४००,१५०० व ४७१०० मीटर धावणे,भालाफेक,गोळाफेक,थाळीफेक,लांब उडी या खेळांचा समावेश आहे.खेळांमध्ये पुरुष,महिला,खुला गट व ४५ वर्षावरील पुरुष,महिला संघाला सहभागी होता येणार आहे.असे आयोजन समितीचे संपर्कप्रमुख डॉ.नितीन उंडे यांनी सांगितले असल्याचे कार्यक्रमाचे प्रसिद्ध प्रमुख राजेश सावरकर यांनी प्रसार माध्यमांना कळविले आहे.
—————————————-
—————————————
अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण
अधिकारी व कर्मचारी यांना दैनंदिन कामातून विरंगुळा मिळावा व आपले कलागुण सादर करता यावे या उद्देशाने दरवर्षी क्रीडा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन जिल्हा परिषदेतर्फे करण्यात येते.मागील दोन वर्षे कोविडमुळे या महोत्सवाचे आयोजन प्रशासनाला करता आले नव्हते.यावेळी होणाऱ्या महोत्सवामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
—————————————-
—————————————-
नृत्य,अभिनय व झाकी याचा समावेश
तीन दिवसीय महोत्सवात सांघिक व वैयक्तिक स्पर्धा होणार असून बहारदार सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.यामध्ये ५७ खेळांचा समावेश करण्यात आला आहे.तसेच सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये भक्ती गीत,भावगीत,लोकगीत,सिनेगीत,कराओके,समूह नृत्य,एकल नृत्य,अभिनय व झाकी यांचा समावेश आहे.