
दैनिक चालु वार्ता हातकणंगले- कवि सरकार इंगळी
ओयासिस वर्ल्ड रेकॉर्ड
कडून 22 जानेवारी ला इंडिया इंटरनॅशनल सेन्टर दिल्ली येथे गणेश तुकाराम पुंडे यांना इंडियन ग्लोरी अवॉर्ड ( भारत गौरव सन्मान )आंतरराष्ट्रीय अतिथी मान्यवरांच्या हस्ते समारंभ पूर्वक प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती ओयासिस वर्ल्ड रेकॉर्ड च्या चेअरमन डॉ सुषमा यांनी दिली आहे. त्याबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.गणेश पुंडे यांच्या साहित्यिक, सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार पराक्रम दिनाचे औचित्य साधून दिल्ली येथे प्रदान करण्यात येणार आहे.
मुळात महाराष्ट्रातील लातूर जिल्ह्यातील धनेगाव या छोट्याशा खेडेगावातून आलेला हा तरुण अनेक अडचणीचा सामना करत साहित्य जगतात आपली ओळख निर्माण केली आहे….खडतर जीवन प्रवास करत गणेश पुंडे यांनी शिक्षण घेतले सरकारी नोकरी ची क्षमता असणारा हा नवयुवक काही कारणाने मागे राहिला तरीही न डगमगता खाजगी नोकरी करत सामाजिक,साहित्यिक,औद्योगिक क्षेत्रात आपल्या नावाचा वेगळा ठसा निर्माण करत त्यांनी यश संपादन केले आहे. अपयशाने न खचता जीवनाच्या या शर्यतीत धावणाऱ्या गणेश पुंडे यांच्या कार्याची दखल विविध संस्था संघटना यांनी घेतली आहे. विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.शून्य से शिखर तक अंतर्गत दिला जाणारा विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर सन्मान, राष्ट्रीय गौरव रत्न पुरस्कार, राष्ट्रीय पद्मागौरव पुरस्कार, राष्ट्रीय साहित्य भूषण पुरस्कार, इंडियन आयकॉन पुरस्कार, साहित्य रत्न पुरस्कार, साहित्य सेवा पुरस्कार, साहित्य साधना पुरस्कार,आंतरराष्ट्रीय छंदोगामात्या पुरस्कार, सुजन भारत पुरस्कार,अशा अनेक पुरस्काराने सन्मानित गणेश पुंडे यांनी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात सलग तीन वेळा सहभाग नोंदवला आहे. विविध चॅनेल्स रेडिओ ने त्याच्या काव्याची दखल घेतली आहे. विविध वर्तमान पत्रात तथा प्रतिनिधिक काव्यासंग्रहात त्यांच्या कविता, लेख प्रकाशित झालेले आहेत.भारतीय पोस्ट खात्याने त्यांच्या नावाने पोस्टल तिकीट काढून अनोखा सन्मान केला आहे. जागतिक संसदेने गणेश पुंडे यांना जागतिक संसदेचे सदस्यत्व बहाल केले आहे.
राजेश दिवटे लिखित झिरो ते हिरो या प्रेरणादायी ग्रंथात गणेश पुंडे यांचा जीवन परिचय प्रकाशित करण्यात आला आहे. एक प्रेरणादायी व्यक्तिमत्व म्हणून त्यांचा गौरव करण्यात आला आहे.
नवीन वर्षाच्या सुरवातीला ओयासिस वर्ल्ड रेकॉर्ड कडून दिला जाणारा हा सर्वोत्तम इंडियन ग्लोरी अवॉर्ड (भारत गौरव सन्मान) मिळाल्या बद्दल गणेश पुंडे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.