
दैनिक चालू वार्ता उपसंपादक परभणी- दत्तात्रय वामनराव कराळे
परभणी : अंतेश्वर येथील दानशूर तथा प्रसिद्ध व्यक्तीमत्व स्व.भीमराव किशनराव कराळे यांच्या २४ व्या पूण्यस्मृती सोहळ्यानिमित्त शेतकरी कामगार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई शामसुंदर जी शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी सौ. आशाताई शिंदे यांनी प्रथम स्व.भीमराव किशनराव पाटील-कराळे यांच्या प्रतिमेचे अभिवादन केले. रामायणाचार्य ह.भ.प. सद्गुरू रामराव महाराज ढोक यांच्या सूश्राव्य अशा हरिकीर्तनाचा आवर्जून लाभ घेतला त्यावेळी सौ.आशाताई यांनी ह.भ.प.रामराव महाराज ढोक यांचा हजारो भाविक-भक्तांच्या उपस्थितीत भक्तीपूर्वक सत्कार केला व त्यानंतर त्यांनी भक्तीभावाने महाराजांचे दर्शन घेतले.
याप्रसंगी सौ.आशाताई शिंदे यांचा समस्त कराळे परिवाराच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. त्यावेळी नांदेड जिल्हा परिषदेतील माजी शिक्षण व बांधकाम सभापती संजय पाटील कराळे, उपसभापती श्या अण्णा पवार, शेकापचे नांदेड जिल्हाध्यक्ष अवधूत पाटील शिंदे, माजी सरपंच प्रकाश पुंडलिक पाटील, हिन्दू पाटील वडजे, माजी चेअरमन सुदामा पाटील कराळे, विद्यमान सरपंच तुकाराम पाटील कराळे, सतीश पाटील कराळे, संचालक सुधाकर सातपुते, चक्रधर डोके, अल्पसंख्याक विभागाचे नेते शेख शेरुभाई, प्रसाद पाटील जाधव, उपसरपंच हनुमंत पाटील जाधव, अशोकराव सोनकांबळे, माधव मोरे, साईनाथ शिंदे, सचिन कल्याणकर, यांच्यासह असंख्य कार्यकर्ते व पदाधिकारी, सभोवतालच्या गावखेड्यांमधील अनेक मान्यवर, समस्त गावकरी, कराळे परिवार आणि हजारो पाहुणे मंडळी नागरिकांची उपस्थिती होती.
ह.भ.प. सद्गुरू रामराव महाराजांच्या सूश्राव्य हरि कीर्तनाचा लाभ उपस्थित मान्यवर, पाहुणे मंडळी व भाविक भक्तांनी मंत्रमुग्ध होऊन घेतला. एकूणच पूण्यस्मरणाच्या या सोहळ्याला सुप्रसिद्ध अशा महाराजांच्या कीर्तनाची जोड आणि औचित्यपूर्ण अशा शिबीरात उदार अंत:करणाने ३३ बाटल्या रक्तदान करुन सदर दात्यांनी आपले श्रेष्ठत्वच सिद्ध केले आहे. भविष्यात ते असंख्य गरजवंतांच्या उपयोगी ठरले जाऊन कित्येक रुग्णांना पुनर्जन्म प्राप्त होणार आहे तर मोफत नेत्र तपासणीत त्या रुग्णांना नवसंजीवनी देण्याचे महत्प्रयासी सेवा करुन आयोजक कराळे परिवारांनी जणू काही पूण्यकर्मच केले आहे. हा सर्व उपक्रम खरोखर आनंददायी असाच ठरला असल्याची चर्चा भाविक भक्तांमध्ये ऐकावयास मिळाली.
या औचित्यपूर्ण सोहळ्यासमयी आयोजित रक्तदान शिबीर पर्वात ३३ दात्यांनी रक्त दान करुन या उपक्रमात आपले श्रेष्ठत्व सिध्द केले आहे असे म्हणायला मुळीच हरकत नाही तर नेत्र तपासणी शिबीरात १९२ रुग्ण नागरिकांनी आपली नेत्र तपासणी करवून घेतली. आयोजकांनी या सुवर्ण संधीचा लाभ देत रुग्णांच्या नेत्रांना एकप्रकारे नवसंजीवनीच पुरवण्याचे पवित्र काम केले आहे. यामुळे सदर रुग्णांना भविष्यात चांगली दूरदृष्टी मौलिक ठरली जाईल एवढे नक्की.