
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड -गोविंद पवार
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा लोहा येथील मुख्य चौकातील पुतळा १९ फेब्रुवारी पूर्वी बसवावा अशी मागणी मराठा सेवा संघ, राजमुद्रा सामाजिक संघटना, अखिल भारतीय छावाच्या वतीने एका निवेदनाद्वारे केलेली आहे.
लोहा नपा चे मुख्याधिकारी यांच्या नावे रितसर निवेदन देऊन सदर निवेदनाद्वारे तालुक्यातील तमाम शिवप्रेमींची इच्छा असल्याचे व लोह्यातील मुख्य चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा बसविण्यासंदर्भात सर्व परवानग्याची मान्यता असताना देखील केवळ राजकीय मतभेदामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अद्याप बसविण्यात आलेला नाही.त्यामुळे शिवप्रेमी जनतेत प्रचंड असंतोष आहे. राजकीय हेवेदावे मतभेद बाजूला ठेवून सर्वसामान्य जनतेची व शिवप्रेमींची अपेक्षा असून १९ फेब्रुवारी २०२३ रोजी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती असून जयंती पूर्वी शिवाजी महाराजांचा पुतळा चौकात बसविण्यात यावा अशी शिवप्रेमींची इच्छा आहे. करिता प्रशासनाने जनतेच्या भावना लक्षात घेऊन पुतळा ताबडतोब चौकात बसविण्यात यावा अन्यथा मराठा सेवा संघ राजमुद्रा सामाजिक संघटना अखिल भारतीय छावा सह विविध सामाजिक संघटना, समाज बांधव आणि सर्व शिवप्रेमी जनतेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल तसेच झालेल्या पुढील परिणामास आपण व आपले प्रशासन जबाबदार राहील. याची गांभीर्याने नोंद घ्यावी असे सदर निवेदनात नमूद केलेले आहे.
सदरील निवेदनावर मराठा सेवा संघाचे नांदेड जिल्हा उपाध्यक्ष बळीराम पाटील पवार, राजमुद्रा सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष शहाजी पाटील शिंदे, अखिल भारतीय छावा तालुकाध्यक्ष कंधारचे संभाजी पाटील लाडेकर, राजमुद्रा सामाजिक संघटना जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत पाटील बस्वदे यांच्या स्वाक्षऱ्या असून सदरील निवेदनाच्या प्रती नगरपरिषद लोहा, तहसीलदार लोहा, सहा.पो. नि. पोलीस ठाणे लोहा यांना दिल्या असल्याचे संबंध तरी सांगितले.