
दैनिक चालू वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भुम:- उपजिल्हा रुग्णालय परंडा येथिल मा. वैद्यकीय अधिक्षक डॉ. व्ही.कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय असंसर्ग जन्य रोग नियंत्रण कार्यक्रम चांदणी विद्यालय आसु येथे शिबीर आयोजित करण्यात आले. सदरील शिबिरामध्ये एकूण ३८० विद्यार्थांची नोंद करून बिपी ,शुगर,कर्करोग तसेच नेत्रतपासणी, मौखिक आरोग्य, लैंगिक समानता, भावनिक व मानसिक आरोग्य, पोषण आहार, इंटरनेटचा सावध वापर व समाज माध्यमावरील सुरक्षिततेचा प्रो्साहन व तंबाखू मुक्त शाळा इत्यादी विषयी मार्गदर्शन तानाजी गुंजाळ समुपदेशक यांनी केले तसेच आरोग्य तपासणी डॉ.यादव,डॉ, जाधव ,अधीपरीचारिका गायकवाड शिवगंगा यांनी उपचार करण्यात आले.सदरील शिबिरामध्ये वैद्यकिय अधिकारी डॉ.अमिता वराडे,अधिपरिचारिका जगदाळे ज्योती यांचा सहभाग शिबिरामध्ये होता.