
दैनिक चालु वार्ता जव्हार प्रतिनिधी-दिपक काकरा.
जव्हार:- पालघर जिल्ह्यातील ग्रामीण भाग तसेच पर्यटनाचे एक मुख्य आकर्षण म्हणून जव्हारकडे नेहमीच पर्यटकांची गर्दी असते.पर्यटनाचा ‘ब’ दर्जा प्राप्त असलेल्या या शहराच्या नगराध्यक्ष व नगरसेवकांचा कार्यकाल संपल्याने या जव्हारचा विकास नियमित राहावा म्हणून १०० वर्ष जुनी असलेल्या जव्हार नगर परिषदेच्या प्रशासक पदी नगर परिषदेच्या मुख्याधिकारी असलेल्या मानिनी कांबळे यांचीच प्रशासक पदी वर्णी लागली आहे.
नवनियुक्त प्रशासक कांबळे यांची जव्हार पत्रकार संघाचे सदस्य पत्रकार संदीप साळवे,अतिक कोतवाल,किशोर जाधव व इमरान कोतवाल यांनी त्यांची भेट घेवून पुढील कार्यास त्यांना शुभेच्छा दिल्या.यावेळी पत्रकार आणि उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांचे शहराच्या विकासाकरिता अनेक मुद्द्यांवरती चर्चा करण्यात आली.जव्हार शहर अतिशय शांत आणि सुंदर आहे.यातील सौंदर्य अधिक बहरावे आणि नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी मी आणि माझे प्रशासकीय अधिकारी व कर्मचारी सदैव कटिबद्ध राहून काम करणार असल्याचा संकल्प यावेळी कांबळे यांनी बोलताना सांगितले.