
दैनिक चालु वार्ता उपसंपादक नांदेड-गोविंद पवार
राजमाता जिजाऊ जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस काँग्रेसचे तालुकाध्यक्ष शरद पाटील पवार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
लोहयात विविध ठिकाणी राजमाता जिजाऊ यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना राजमाता यांना अभिवादन करता यावे म्हणून लोहा येथील भाजी मंडई चौकात लोहा न.पा. च्या वतीने राजमाता जिजाऊ जयंती निमित्त सर्वांना अभिवादन करण्यात यावे यासाठी भव्य मंडप टाकून राजमाता जिजाऊ यांचे मोठे तेलचित्र ठेवण्यात आले होते.
यावेळी अभिवादन करताना काँग्रेस तालुका अध्यक्ष मा उपनगराध्यक्ष शरद पाटील पवार कोषाध्यक्ष शिवाजीराव आंबेकर मा सभापती पंकज परिहार भीमराव पाटील शिंदे पत्रकार कांबळे सर अकबर शेठ प्रसाद पोले पत्रकार सचिन पवार व्यंकटराव घोडके बाळू कोरडे आदिंची उपस्थिती होती