
दैनिक चालु वार्ता म्हसळा प्रतिनिधी – अंगद कांबळे
दि १२ जानेवारी २०२३ रोजी रा जि प आदर्श शाळा खरसई मराठी या शाळेत राजमाता जिजाऊ यांची ४२५ वी जयंती आणि स्वामी विवेकानंद यांची १६० वी जयंती निमित्त ईयत्ता 6 वी वर्गाने बालसभेचे नियोजन केले होते.
यावेळी बालसभेचे अध्यक्ष नम्रता म्हात्रे (विद्यार्थ्यीनी) भूषवले प्रमुख पाहुणे शाळा कमेटी अध्यक्ष निलेश मांदाडकर , विद्यमान उपसरपंच नजीर जहांगीर ग्रा प सदस्या संजीता शितकर, अश्वीनी खोत , विमल कांबळे ,दक्षिणी पयेर , एस एम सी सदस्य भारती शितकर , चांगीबाई म्हात्रे, योगीता खोत,गणेश मांदाडकर पालक ज्योती शितकर,मुख्याध्यापक श्री बालाजी राठोड सर सहकारी शिक्षक अशोक सानप, मडावी, शेबाळे, जयसिंग बेटकर पालकवर्ग. आणि शिक्षक वृंद उपस्थित होते.
विद्यार्थ्यांनी मान्यवरांचे स्वागत व बालसभेचे प्रास्ताविक उज्वला खोत हिने केले. प्रतिमेचे पूजन करून बालसभेला सुरुवात करण्यात आली. यावेळी आदर्श शाळेतील विद्यार्थ्यांनी सुंदररित्या राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद, राष्ट्रीय युवा दिन निमित्त भाषणे व कविता सादर केल्या.
ऐतिहासिक देखावा बालकलाकारांनी सादर करत छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ यांच्या आठवणी जाग्या केल्या. उपस्थित शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले या बालसभेला उपस्थित, एस एम सी कमेटी अध्यक्ष निलेश मांदाडकर व उपसरपंच नजीर जहांगीर यांनी बालसभेला शुभेच्छा दिल्या. या बालसभेचे सुत्रसंचलन सार्थकी घाणेकर हिने केले. आभार प्रदर्शन प्रणय शितकर यांने केले. तसेच बाल सभेचे सुंदररित्या नियोजन केले.
राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती कला व वाणिज्य उच्चमाध्यमिक विद्यालय मेंदडी येथे साजरी
कला व वाणिज्य उच्चमाध्यमिक विद्यालय मेंदडी येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी कॉलेज चे प्राचार्य मा. संदिप कांबळे यांनी राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या कार्यावर प्रकाश टाकला व त्यांचे कार्य हे खूप मोठे व प्रेरणादायक आहे विद्यार्थ्यांनी हीं आपले मनोगत व्यक्त केले ज्या मध्ये मुलींची संख्या जास्त प्रमाणात होती या प्राध्यापक वैभव नाकती, प्रा. अंगद कांबळे, प्रा. आकाश साळवी व विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. वैभव नाकती यांनी केले तर आभार प्रा. आकाश साळवी यांनी मांडले केले
जिजामाता मराठी माध्यमिक शाळा आगरवाडा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्सहात साजरी करण्यात आली !
मराठी माध्यमिक शाळा आगरवाडा येथे राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली या वेळी मुख्याद्यापक श्री संदिप कांबळेकर, श्री दिपक म्हात्रे, व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते