
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
आदिवासी युवा संघर्ष समिती आयोजित ” आदिवासी स्वाभिमानी समाज प्रबोधन मेळावा तथा सल्ला गांगरा अनावरण सोहळा ” संपन्न झाला.कार्यक्रमाची सुरुवात आदिवासी संस्कृती दर्शन गावातून शोभायात्रा काढण्यात आली. त्यानंतर सल्ला गांगरा अनावरण व सप्तरंगी ध्वजारोहण पाहुण्यांच्या हस्ते,करण्यात आले. प्रबोधन स्थळी कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन तथा महापुरुषांच्या फोटोला माल्यार्पण तथा पूजनाने, स्वागत गीत तथा स्फूर्ती गीताने झाली.
या कार्यक्रमाचे उदघाटक मा. दिनेश बाबुरावजी मडावी राष्ट्रीय अध्यक्ष परधान समाज संघ, तथा उपाध्यक्ष अ. भा. आदिवासी विकास परिषद, महाराष्ट्र प्रदेश,तर कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. कुसुमताई अलाम जेष्ठ साहित्यिक, गडचिरोली, कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक भोला मडावी राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदिवासी परधान समाज संघ,परप्रब्रह्मनंद मडावी, मूल वास्तववादी विचारवंत तथा साहित्यिक,मा.संदीप सलामे सरकारी अभियोक्ता, हिंगणघाट मा. कपिल तिराणकर उद्योजक, चंद्रपूर, विशेष अतिथी मा.प्रवीण गेडाम, सावली,पत्रकार,लक्ष्मण सोयाम,मूल गुरुदास कन्नाके,खेडी प्रमुख उपस्थिती माजी सरपंच,शंकरराव बोदलकर, गोकुळदास भुरसे, पंडित कुंघडकर, प्रमोद खोबे उपसरपंच, दिलीप लटारे माजी उपसरपंच, निरे सर मुख्याध्यापक जि. प. शाळा, लोंढोली, भास्कर गेडाम, सुनिल आत्राम,यांची उपस्थिती लाभली.
उदघाटकीय भाषणातून मा.दिनेशभाऊ मडावी यांनी समाजाची वस्तुस्थिती व दिशा ह्या अनुषंगाने मार्गदर्शन करून आव्हान केले की,समाजाने आपले हक्क व अधिकार प्राप्त करण्यासाठी आम्हाला संविधानिक लढाई लढावीच लागेल.त्यासाठी आम्हाला सामाजिक एकोपा प्रस्थापीत करून सरकारला आपली ताकत दाखवावी लागेल.अन्यथा आम्हाला आमचे हक्क व अधिकार प्राप्त होणार नाही.
मा.ऍड.संदीप सलामे साहेब यांनी संविधानिक आदिवासी कायदे व त्याचे महत्व पटवून दिले. मा.परब्रह्मानंद मडावी यांनी बिरसा मुंडा यांचे संपूर्ण जीवनचरित्र पटवून दिले व आदिवासी उलगुलान कसे असे पाहिजे याचे महत्व विषद केले. मा.कपिल तिराणकर यांनी आदिवासी अर्थक्रांती कसे करू शकतील व आधुनिक युगात आम्हाला त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे हे पटवून दिले.
मा. भोला मडावी यांनी आदिवासी अर्थक्रांती,समाज बांधिलकी ह्या दोन्ही विषयाचा मेळ साधत आम्ही भीती व अंधाराच्या विचारात स्वतः ला न ठेवता सर्व पद्धतीय संस्कृतीला हाथ घालत एकत्र येण्याचे आव्हान करीत काही शासकीय योजना व कार्यपद्धती यासांबधी मार्गदर्शन केले. मा.प्रवीण गेडाम यांनी मोर्चे आंदोलने निवेदने यावर भाष्य केले.
दरम्यान नवनियुक्त सरपंच उष्टु पेंदोर लोंढोली यांनी ग्रामपंचायत व त्याचे महत्व सांगितले व समाजाचे नाव मोठ करण्याचे आश्वासन दिले. शंकरराव बोदलकर यांनी शुभेच्छापर मार्गदर्शन केले.आणि इतर प्रमुख पाहुण्यांनी सुद्धा मार्गदर्शन केले.
अध्यक्ष म्हणून सर्व झालेल्या मार्गदर्शनाचा उहापोहा करीत मा.कुसुम अलाम यांनी समाजाला एकत्र येण्याचे आव्हान केले, आदिवासी समाजावर होत असलेले अन्याय अत्याचार थांबले पाहिजे, आदिवासी समाजाला न्याय हक्क मिळाले पाहिजे, आदिवासी समाज उच्च शिक्षण घेऊन सक्षम झाला पाहिजे, भारतातील आदिवासी जमात एकसंघ यायला हवी, ग्रामसभेचे महत्त्व विशद केले. तसेच त्यांनी आयोजक, संयोजक तथा ग्रामवासियांचे कौतुक केले.
कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन कवी नरेंद्र कन्नाके यांनी केले.तर प्रास्ताविक कवी नीरज आत्राम सामाजिक कार्यकर्ता यांनी केले.तर आभार प्रदर्शन मा.दिलीप आत्राम यांनी केले.
कार्यक्रमा दरम्यान आदिवासी उदबोधन गिते व नृत्य सुद्धा सादर करण्यात आले होते ज्याला.कार्यक्रमाचे उदघाटक दिनेशभाऊ मडावी यांनी दाद देत कौतुकास्पद बक्षीस प्रदान केले.
कार्यक्रमानंतर गावकरी तथा पाहुणेमंडळी यांना सामूहिक भोजन समारंभ सुद्धा पार पडला.कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे समस्त गावकारी लोकांनी कार्यक्रमात सहभाग नोंदवीला ज्यात इतर समाजाचे प्रमुख घटक बहुसंख्येने सामील झालेले होते.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संयोजक,नीरज आत्राम,लोंढोली वासी, आदिवासी समाज बांधव,बघिनी,अध्यक्ष भास्कर गेडाम, सचिव सुनिल आत्राम, दिलीप आत्राम, सुरेश मेश्राम,मुर्लीधर शिडाम, पुरुषोत्तम कुडमेथे, मारुती कोडापे, धनराज मेश्राम,ओमदेव आत्राम,मोरेश्वर आत्राम, ताताजी अलाम, अंबादास अलाम,प्रमोद मेश्राम, उमेश आत्राम, प्रवीण मेश्राम, लीलाधर पेंदोर, महेंद्र आत्राम, सचिन पेंदोर, अंकुश आत्राम, सुरज आत्राम, अमर सुरपाम, निखिल गेडाम, मयूर कुलसंगे, आकाश मेश्राम, रोशन आत्राम, सुरज कोडापे, अक्षय सिडाम, मासूम मेश्राम, श्रेयस कुळमेथे,आणि समस्त आदिवासी बंधू, बघिनी आदिवासी युवा संघर्ष समिती लोंढोली यांनी अथक परिश्रम घेतले आहे. या कार्यक्रमाला चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी समाज बांधव तथा लोंढोली ग्रामवासी बहुसंख्येने उपस्थित होते. सर्व स्तरातून या कार्यक्रमाचे कौतुक करण्यात येत आहे.