
दैनिक चालू वार्ता नांदेड उत्तर प्रतिनिधी -समर्थ दादाराव लोखंडे
============================
दिनांक:१२ जानेवारी २०२३ रोजी श्री शिवाजी विद्यालय रांजणगाव (शे.पू .) ता गंगापूर येथे राष्ट्रमाता जिजाऊ जयंती व युवकाचे श्रद्धास्थान स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली राष्ट्रमाता जिजाऊ जयंती निमित्त प्रती वर्षाप्रमाणे दिला जाणारा राष्ट्रमाता जिजाऊ पुरस्कार शाळेतील सेवा जेष्ठ शिक्षिका ग्रंथपाल *श्रीमती आशा बाळासाहेब साळुंखे* यांना प्रदान करण्यात आला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे मुख्याध्यापक अनिलकुमार घारुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून मा.शिक्षक उपसंचालक आदरणीय सुधाकर बनाटे साहेब तसेच सौ.पी.एस.बनाटे मॅडम उपस्थित होत्या. यावेळी अनेक विद्यार्थ्यांचे भाषणे झाली. इतिहास विषयाचे शिक्षक श्री शिवकुमार होनराव यांनी युवकांचे नेते युवकांचे श्रद्धास्थान स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावर प्रकाश टाकला तर राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जीवनावर श्री अनिल भांड यांनी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शाळेतील पर्यवेक्षिका सरोज पवार , शालेय समिती शिक्षकेत्तर सदस्य विजयसिंह परदेशी,सुरेश सुलताने ,भगवान वनारसे , संतोष बंडेवार, दादासाहेब हजारे, सविता गोसावी , रमा आडे, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली सपकाळ यांनी केले तर आभार ज्योती भालेराव यांनी मानले.