
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- संभाजी गोसावी
महाबळेश्वर-पाचगणी पोलीस ठाण्याचा पदभार नवनियुक्त राजेश माने यांनी मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्याकडून घेतला पदभार तर मावळते सहायक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांच्या पावणेतीन वर्षाच्या कालावधीनंतर पाचगणी पोलीस ठाण्यातून सातारा आर्थिक गुन्हे शाखेत बदली करण्यात आली. जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख यांनी बुधवारी रात्री उशिरा जिल्ह्यांतील प्रभारी अधिकाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या करण्यात केल्या. यामध्ये भुईंज,मेढा पाचगणी, पाटण,मसूर तळबीड,कोरेगांव पुसेगांव या पोलीस ठाण्यांना मिळाले नवे कारभारी. पाचगणी पोलीस ठाण्यांचे मावळते सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख अजयकुमार बन्संल यांच्या कार्यक्रमांमध्ये कराड शहर पोलीस ठाण्याहून पाचगणी पोलीस ठाण्यात तत्कारीन सहा: पोलीस निरीक्षक विकास बडवे यांच्याकडूंन त्यांनी पाचगणी पोलीस ठाण्याचा पदभार घेतला होता. श्री.पवार यांचा कार्यकाळ पाचगणी नगरीमध्ये उत्कृंष्ट राहिला. महाबळेश्वर पाचगणी हे पर्यटन ठिकाण म्हणून ओळखले जाणार ठिकाण असून. या शहरात पर्यटकांची मोठी गर्दी होत असते. अशातच वाहतुकीचा प्रश्न असो किंवा पाचगणी ग्रामीण भागातील निवडणुका सण उत्सव या काळामध्ये कायदा-सुव्यवस्था अबधित राहण्यासाठी श्री. पवार यांनी आपल्याला पोलीस सहकाऱ्यांसमवेत पाचगणी नगरीमध्ये व ग्रामीण भागामध्ये कामकाज पाहिले. तसे त्यांच्या कार्यकाळामध्ये पाचगणी पोलीस ठाण्यांच्या हद्दीमध्ये आणि गुन्हे त्यांनी उघडकीस आणले.अवैध-धंद्यावर त्यांनी धडक कारवाई सुरु ठेवली होती. सहायक पोलीस निरीक्षक श्री. सतीश पवार यांच्या बदलीचे वृत्त पाचगणी नगरीमध्ये समजतात शुक्रवारी दिवसभरात पाचगणी परिसरातील व ग्रामीण भागातील मंडळींनी श्री.पवार यांची भेट घेत पवारांना शुभेच्छा देत त्यांच्या कामगिरीबद्दल कौतुक केले. यावेळी नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात शुक्रवारी दुपारी पदभार घेतला. यावेळी तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी त्यांचे स्वागत केले यावेळी उपस्थित मंडळींनी नूतन सहायक पोलीस निरीक्षकांचे स्वागत करीत साहेबांना शुभेच्छा दिल्या. यावेळी जिल्हास्तरीय प्रतिनिधी संभाजी पुरीगोसावी यांनी नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.माने व तत्कालीन सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री.पवार साहेबांचे सोशल मीडियावरुन अभिनंदन करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.