
दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व पुरंदर सासवडचे विद्यमान आमदार संजय जगताप यांच्या वाढदिवसानिमित्त इंदापूर तालुका काँग्रेस च्या वतीने इंदापूर येथील आर के शहा शाळेतील लहान मुलांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर तसेच काॅंग्रेसचे जेष्ठ नेते काकासाहेब देवकर यांनी आपले मनोगत व्यक्त करून पुणे जिल्हा काँग्रेस चे अध्यक्ष आमदार संजय जगताप यांच्या कार्याची माहिती मुलांना दिली. आर के शहा विद्यालयाच्या वतीने सर्व मान्यवरांचे सहर्ष स्वागत करण्यात आले.
यावेळी इंदापूर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष आबासाहेब निंबाळकर, इंदापूर तालुका काँग्रेस चे कार्याध्यक्ष तानाजी भोंग, जेष्ठ नेते काकासाहेब देवकर, काँग्रेस ओबीसी सेल चे तालुका अध्यक्ष बापूसाहेब बोराटे, उजेर शेख, राहूल आचरे, संतोष शेंडे ,बापू व्यवहारे, अरूण राऊत, चमनभाई बागवान,जकिर काझी, नागनाथ देशमुख, सुरेश सुर्यवंशी, गुलाब फलफले,नसीर शेख तसेच शाळेतील शिक्षक आणि कर्मचारी उपस्थित होते.