
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी:संतोष मनधरणे
देगलूर:आज दि. 16/01/2023 रोजी, 10:30 वा. दरम्यान महाराष्ट्र शासन निर्णय तसेच मा.सारंगल साहेब अपर पोलीस महासंचालक (वाहतूक), महाराष्ट्र राज्य मुंबई,
मा. सोळंके पोलीस अधिक्षक सा, तसेच मा. वैरागडे मॅडम, रविन्द्र दुबे पोलीस निरीक्षक , महामार्ग प्रादेशिक विभाग नागपूर, यांचे मार्गदर्शन सूचना प्रमाणे म.पो.केंद्र करंजी *”रस्ता सुरक्षा अभियान 2023″ अंतर्गत* सैनिक पब्लिक स्कूल वडकी येथे मा. प्राचार्य श्री. सचिन ठमके सर तसेच शिक्षकवृंद, परिसरातील प्रतिष्टीत नागरिक व मृत्युंजय दूत, यांचे उपस्थिती मध्ये सोबत असलेला पो. स्टाफ PSI लाकडे, झोडगेकर सा. यांचे सह सैनिक पब्लिक स्कूल वडकी येथे विदयार्थ्यांची जनजागृती रॅली काढून त्यांना वाहतूक ** नियमाबाबत माहिती देऊन प्रबोधन करण्यात आले. सदर प्रबोधन कार्यक्रमादरम्यान 100 ते 150 विद्यार्थीचा समावेश होता. आयोजित कार्यक्रमात तेथील शिक्षक वृंद व विद्यार्थी यांना रस्ता सुरक्षा संबंधाने वरिष्ठांनी दिलेल्या आदेश तसेच सुचनेप्रमाणे दहा सोनेरी नियम व इतर सुरक्षेसंबंधीच्या बाबी अवगत करून दिल्या. तसेच वेग मर्यादे संबंधाने इंटरसेप्टर वाहनाची माहिती देऊन कार्यशाळा घेण्यात आली.
सदर रस्ता सुरक्षा अभियान 2023 कालावधीत महामार्गावर अपघात प्रमाण कमी करण्यासाठी शालेय विद्यार्थी करीता मार्गदर्शन व स्पर्धा अशा विविध जन-जागृती कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आसे संदीप मुपडे
सहायक पोलीस निरीक्षक,
म.पो.केंद्र करंजी जिल्हा यवतमाळ यांनी सांगितले आहे.