
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
कंधार :-पेठवडज तालुका कंधार येथील धान्याच्या गोदामात आवक वेळी गाडीतील माल धान्य गोदामातील थप्पीला नेते वेळेस प्रत्येक धान्याच्या पोत्यातील लोखंडी पंम्पाच्या सहाय्याने धान्य काढून घेतले जाते.व ते धान्य थवेगळ्या पोत्यामथ्ये भरून मोटारसायकल व्दारे गोदामाच्या बाहेर जात आहे.असा नित्यक्रम गोदामाच्या परीसरातील नागरिकांच्या निदर्शनास येते आहे.ही बाब गंभीर स्वरूपाची असून धान्याची लूट /भ्रष्टाचार /चोरी होत असून त्यामुळे शासनाची दिशाभूल करत धान्य बाहेर जात आहे.गोदामातील चाचणी नोंदवही , धान्य आवक नोंदवही, धान्य वाहतूक तूट,गोदाम तूट, स्वच्छता तूट आणि आवक जावक शिल्लक आठवडा गोषवारा यांची तपासणी तसेच चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी गजानन तुकाराम जाधव राहणार पेठवडज यांनी जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन देऊन मागणी केली आहे.