
दैनिक चालु वार्ता हातकणंगले प्रतिनिधी- कवि सरकार इंगळी
कवी लेखक ग्रामविकास अधिकारी पदावर कार्यरत असलेले तानाजी धरणे यांची ” हेलपाटा ” ही कादंबरी प्रकाशनाच्या वाटेवर आहे . पि . आर ग्रुप वरुड अमरावती हे प्रकाशन ती प्रकाशित करत आहे .सन १९७७ ते १९९८ या कालखंडातील ग्रामिण जीवनावर आधारीत हालअपेष्टा सहन करत , कोसोमैल पायपीट करत पोटाची खळगी भरणार्या कुटुंबाची ही व्येथा आहे . अनेक अडचणीवर चिकाटी , जिद्ध , मेहनत व प्रमाणीकपणा यांचे जोरावर अतिशय प्रतिकुल परिस्थितिचा सामना करत , गरीबीचा कोणताही देखावा न करता जीवन मार्गक्रम करतात . कधीतरी आपल्याला यश नक्की मिळेल या आशेवर येणार्या संकटांचा सामना करणार्या किशोरवयीन तरुणांने शिक्षण घेण्यासाठी डोक्यावर प्रसंगी भाजीची पाटी घेऊन दारोदार भाजी विकली . नोकरीचा फाॅर्म भरल्यावर घरी जायला एक रुपया कमी होता . म्हणुन तो कोणालाही न माघता आठ किलोमीटर चालत घरी जातो . शालेय जीवनात सपरावर शेकरायला साधं सरमड मिळालं नाही तर दुसर्याच्या बांधावरच्या ‘ हारळीच्या काशा ‘ आणुन टाकल्या . पुस्तकांसाठी किंव्हा कौटुंबीक कारणासाठी ज्या शेठकडे त्याचे वडील सालानी होते . त्या शेठकडुन काही पैशांसाठी त्याचे बाबा महीना दिड महिना ‘अनवाणी ‘ पायांनी रोज ‘ हेलपाटे ‘ मारायचे याचा हृदयस्पर्शी घटनाक्रम कादंबरीत चिञीत केलेला आहे . वडील मुलीच्या लग्नासाठी बाजारात बैल विक्रिला घेऊन जातात . एक बैल विकला जातो व एक बैल घरी घेऊन येताना राञ झाल्यामुळे होडीवाला घेण्यासाठी येत नाही . व राञभर पुराच्या पाण्याशी संघर्ष करत आख्खी राञ पावसात विना अन्नापाण्याशिवाय वडील पावसात भिजुन काढतात . सकाळी उजाडल्यावर पहातात पर झुडपाला बांधलेला बैलही राञी पुरात वाहुण गेलेला असतो . अशी ही कादंबरी वाचताना वाचकाच्या डोळ्यांच्या कडा नकळत पान्हावल्या जातात . अशा हालाखित जीवन व्यथीत करुन आपले शिक्षण पुर्ण करुन शासकीय नोकरीत कामाला लोगलो . या सार्या घटनाक्रमांचा ‘लोखाजोखा ‘ लेखकाने ” हेलपाटा ” या कादंबरीत मांडला आहे . आज शिक्षण घेणार्या असंख्य मुलामुलींना शिक्षण घेताना बळ यावे व माणुस प्रतिकुल परिस्थितुन शिक्षण घेऊन त्याने आपले इच्छित ध्येय घाटावे व प्रतिकुल परिस्थितीत शिक्षण घेणार्या विद्यांर्थ्यांना प्रेरणा मिळावी अशी आशा लेखकाला आहे .