
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा तालुक्यात यावर्षी झालेल्या
अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील पिकांची झालेली वाताहत पाहता शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकां- साठी सुयोग्य नियोजन करून शेतात लागवड केली. आता मात्र, रब्बीतील पिके चांगली डौलदार दिसत असताना ढगाळ वातावरणामुळे पिकांवर रोगराईचा प्रकोप सुरू झाला आहे. या रोगराई पासून पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची औषध फवारणीसाठी ची लगबग सुरू झाली आहे.
यावर्षी सुरुवातीला रब्बी हंगामातील पिकांसाठी वातावरण चांगले होते. त्यामुळे रब्बी पिकांचे उत्पादन यावर्षी दुप्पट होईल अशी आशा शेतकऱ्यांना लागलेली होती. परंतु तालुक्यात सततच्या वातावरण बदलामुळे ढगाळ व वातावरणामुळे रब्बीच्या सर्वच पिकांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. शिवाय तूर पिक सुद्धा शेतात उभेच वाळत आहे. त्यामुळे तुर पिकाच्या..उत्पन्नातही घट होणार आहे. तालुक्यात या वर्षी अतिवृष्टी झाल्यामुळे जमिनीमध्ये जास्त काळ पा साचून राहिल्याने व योग्य वेळ ओलावा कमी झाल्याने शेत जमिनीमध्ये बुरशीचे प्रमाण वाढल खरिपातील सोयाबीन सह पिकांची नासाडी झाली कपाशीला ही रोगराईने विळख्यात घेतले. त्यामुळे पिकांचे उत्पादन घटले. सर्व आशा रब्बी पिकां असताना तालुक्यात सर्वत्र ढगाळ वातावरणाने पाहता पाहता गव्हाची वाढ खुंटली हरभऱ्यावर अळी पडली असून काही ठिकाणी हरभराचे उभे झाडंच जळत असून शेतात थळगेच थळगे वाळलेले दिसत आहे सर्वच पिकांनाही रोगराईने घेरल या संकटाची साखळी चालू असल्यामुळे शेतकरी चिंतेत असून रब्बी पिके वाचवण्यासाठी शेतकरी फवारणीची लगब करू लागला असल्याचे चित्र तालुक्यात सर्वत्र दिसू येत आहे..