दैनिक चालु वार्ता प्रतिनीधी- गुरुनाथ तिरपणकर-गेली तब्लल१३वर्षे सुरु असलेला मुंबई गोवा महामार्ग लवकरात लवकर पुर्ण होऊन कोकणवासियांचे हाल कमी व्हावेत या अनुषंगाने मुंबई गोवा महामार्ग जनआक्रोश समिती आणि आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान तर्फे रविवार १५जानेवारी रोजी शिवसेना शाखा छत्रपती शिवाजी महाराज नगर वडवली शाखा अंबरनाथ पूर्व येथे सह्यांची मोहीम राबवण्यात आली.या जनआक्रोश आंदोलनात अंबरनाथ मधील बहुसंख्य कोकणवासियांनी सहभाग नोंदवून मुंबई गोवा महामार्गचे काम लवकरात लवकर पुर्ण व्हावा अशी आशा व्यक्ती केली आहे. या सही मोहीमेत आम्ही रायगडकर सेवा प्रतिष्ठान संघटनेचे अध्यक्ष गोविंद मोरे,सेक्रेटरी शिवाजी विठ्ठल पार्टे,कार्याध्यक्ष संजय जयराम उतेकर,खजिनदार नितेश चव्हाण,सल्लागार विलास आंग्रे,प्रफुल्ल कदम,गणेश भोर,योगेश राऊत,तुषार शेडगे,प्रितम मालुसरे,पत्रकार पंकेश जाधव(कर्जत)आदी मान्यवरांचा विशेष सहभाग होता.


