दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी- बाजीराव गायकवाड
सावरगाव :- शंभु महादेव यात्रेनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व कुस्त्यांच्या दंगलीचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक २२ जानेवारी रविवार ह. भ .प.श्री.गोविंद महाराज मुडे यांच्या हस्ते आरंभ होऊन दिनांक २९ जानेवारी रविवारी सांगता होणार आहे.दैनदिन कार्यक्रम पहाटे ३ ते ६ काकडा व महाभिषेक सकाळी ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, गाथा भजन १० ते १२ , दुपारी ४ ते ६ ज्ञानेश्वरी प्रवचन सायंकाळी ६ ते ७ हरीपाठ , रात्री ९ ते ११ हरी किर्तन दि.२२ रविवारी ह.भ.प.श्री.गोविंद महाराज गुंडे आंबुलगेकर ,दि २३सोमवारी ह भ प श्री.तुळशीराम महाराज गऊळकर,दि.२४मंगळवारी ह भ प श्री.शैलेश महाराज देशमुख कामठा ,दि.२५ बुधवारी ह भ प श्री श्रीधर महाराज कासराळी,दि. २६ गुरुवारी ह भ प रूपालीताई सवणे परतुरकर, दि. २७ शुक्रवार ह भ प श्री.मोहन महाराज खुरदळीकर,दि.२८ शनिवारी ह भ प श्री काशिनाथ महाराज फुलकळसकर, दि. २९ रविवार ह भ प श्री व्यंकटेश महाराज हाडोळीकर यांचे काल्याचे किर्तन सकाळी ९ ते ११ होईल त्यानंतर सार्वजनिक महाप्रसाद गावकरी मंडळी सावरगाव यांच्या वतीने करण्यात येणार आहे भजनी मंडळी :-रुई ,पेठवडज ,आंबुलगा, शैल्लाळी,गऊळ, श्री विठ्ठलेश्वर भजनी मंडळ व आनंद संप्रदाय भजनी मंडळ सावरगाव निपाणी यात्रेतील कार्यक्रम प्रवचन सोहळा श्री प.प्र.बु.१०८ वीरूपक्ष शिवाचार्य महाराज श्री.गणाचार्य मठ संस्थान मुखेड यांचे प्रवचन दि.२८ शनिवारी दुपारी ३ ते ५ दि.३० सोमवारी कुस्त्यांची दंगल ५००१ प्रथम बक्षीस,३००१व्दितीय बक्षीस दि.२८ शनिवारी रात्री ११ वाजता संगीत भारूड दिंड्याचा कार्यक्रम कामठा विरूद्ध पारडी,देवीचा होम सायंकाळी देवकर कैलास वडजे,दि.२९ लोकनाट्य तमाशा कार्यक्रम ठेवण्यात आला असून परीसरातील भाविक भक्तांनी सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी सावरगाव निपाणी ता.कंधार यांनी केले आहे.


