दैनिक चालु वार्ता वृत्तसेवा –
महाशक्ती ग्रुप ची पुण्यात मिटिंग संपन्न झाली त्यावेळी गेल्या 2 वर्षात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या परभणी जिल्हा संपर्क प्रमुख ख्वाजा भाई यांची महाशक्ती मराठवाडा प्रसिद्धी प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली. यावेळी महाशक्ती ॲम्ब्युलन्स ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष शरद कात्रजकर , सचिव अर्जुन चव्हाण
व परभणी जिल्हा अध्यक्ष संजय जांबळकर व महाराष्ट्रातीला ॲम्ब्युलन्स चालक व मालक सहकारी यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. संपूर्ण महाशक्ती टीम कडून ख्वाजा भाई यांना शुभेच्छा देण्यात आल्या


