पवई ओलीस नाट्यप्रकरणात मुंबईतील पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. एकीकडे पोलिसांनी १७ ओलीस मुलांना सोडवलं. दुसरीकडे पोलिसांनी आरोपीवर गोळीबार देखील केला होता. गोळीबारात जखमी झालेल्या आरोपी रोहित आर्यला रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
त्यानंतर आरोपी रोहित आर्य याचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.


