दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;;
आर्णी तालुक्यातील असलेल्या सावळी सदोबा अवैद्य धंद्याचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावळी सदोबा परिसरामध्ये अवैद्य रेतीची तस्करी मोठ्या प्रमाणात सुरू आहेत,तालुक्यातील एकही रेतीघाटाचा लिलाव झालेला नसून,अवैद्य रेती तस्करी प्रकरणामुळे शासनाचा लाख रुपयाचा महसूल बुडल्या जात आहे,प्रत्येक घडामोडीवर प्रशासनाचे बारीक लक्ष असून सुद्धा,सावळी सदोबा परिसरामध्ये खुलेआम रेती तस्करी चालतंय,कुठे रेती तस्करांचे संबंधितांशी साटेलोटे तर नाहीत असा प्रश्न जनसामान्य तून उपस्थित होत आहेत,आर्णी तालुक्यात सहरी तस्करांचे पूर्णता जाळे पसरलेले आहेत सहज आणि सोप्या पद्धतीने झटपट पैसे कमवण्यासाठी सगळ्यात मोठा धंदा म्हणून रेती तस्करी कडे बघितले जात आहे विशेष म्हणजे या धंद्यात मोठमोठे पांढरपेशी उतरल्याने त्यांना आवरने प्रशासनाच्या आटोक्याबाहेर आहेत असे वाटते तस्करीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम राबवली तरच तस्कर आपली रेती तस्करी थांबवतील,अन्यथा पैनगंगा नदी पत्राची रेती माफिया लुटून पर्यावरणाचा रास करतील यात तिळमात्र शंका नाहीत,रेतीतस्करीची माहिती
महसूल अधिकारी,तलाठी,पोलीस यांना या प्रकरणाची जाणीव आहे.”आम्ही येतो तुम्ही पळा”असा देखावा निर्माण करण्यात येऊन, संघनमताने शासनाचा कोट्यावधी रुपयांचा महसूल शासनचेच अधिकारी बुडवीत असल्याचे सर्वत्र बोलल्या जात आहे.चिमटा घाटातील रेती बारीक व उच्च प्रतीची असल्यामुळे सीमावर्ती जिल्ह्यातही मोठी मागणी आहे.पण रेती घाटाचे लिलाव झाले नसल्यामुळे रेती तस्करांचा उदय झाला आहे.सावळी सदोबा येथील रस्त्याने अवैध रेतीच्या ट्रॅकची ओव्हर लोड वाहतूक सुरू असल्याने रस्त्याला ठीक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडून रस्त्याची दुर्दशा झाली आहे.त्यामुळे या रस्त्यावरून जाणाऱ्या येणाऱ्यांना इतर नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.याकडे शासनाने लक्ष देऊन रेतीचोरीला मदत करणार्या अधिकार्यांनवर कार्यवाहीची मागणी सावळी सदोबा परिसरातील नागरीकांनी केली आहे.


