
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
जालना मंठा..तालुक्यातील
शासकीय, निमशासकीय कार्यालयांतील कामकाज आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यपद्धतीबाबत अनेक तक्रारी असतात. आपल्या तक्रारी वरिष्ठांसमक्ष जाणार या हेतूने संबंधित विभागाच्या दिशानिर्देशाने बहुतांश शासकीय कार्यालयांत तक्रारपेट्या लटकविलेल्या दिसायच्या. मात्र, आता या तक्रारपेट्या गायब झाल्या आहेत. संबंधितांची तक्रार करावी कुठे ? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे. शहरी भागातील अतिमहत्त्वाची कार्यालये तसेच ग्रामीण भागातील विविध विभागाच्या कार्यालयात शेकडो नागरिक गावखेड्यातून आपल्या विविध कामानिमित्त तालुक्याला ये-जा करतात. परंतु कार्यालयात कर्मचारी भेटत नाही. जरी भेटला तर एका चकरात काम होत नाही. संबंधित कामात येणाऱ्या अडचणीमुळे अनेक प्रकारच्या तक्रारींचा निर्वाळा कालावधीत होत नाही. त्याचा त्रास सामान्य जनतेला होत आहे. कोणतीही तक्रार देण्याची इच्छा असतांनाही कार्यालयात तक्रार पेट्याच नसल्याने तक्रार करावी तर कुठे ? असा प्रश्न निर्माण होत आहे.