
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती :- गेल्या काही दिवसापूर्वी प्रहारचे माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांचा अपघात झाला होता.या अपघातात ते गंभीर जखमी झाले होते.रस्ता ओलांडताना दुचाकीस्वाराने आ.बच्चू कडू यांना धडक दिली होती.या अपघातात आमदार कडू यांच्या पायाला आणि डोक्याला दुखापत झाली होती.या अपघातानंतर हा अपघात नाही तर घातपात असल्याच्या चर्चा सुरू होत्या.या चर्चांवर आता स्वतः बच्चू कडू यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
अपघात की घातपात या चर्चांवर आमदार कडू यांनी मोठा खुलासा केला आहे.’ हा अपघात आहे,अतिशय कमी जागा होती,त्यामुळे हा अपघात झाला.यात कोणताही घातपात झालेला नाही.त्याची बाईक वेगाने नव्हती,मी टर्न झाल्यामुळे हा अपघात झाला,अशी प्रतिक्रिया आमदार बच्चू कडू यांनी दिली.’माझी प्रतिक्रिया न घेता या चर्चा सुरू होत्या हे चुकीच होते.ज्याचा अपघात झाला त्यांना तर विचारायला हवे होते.कोणत्याही गोष्टीचे राजकारण करावे पण शहानिशा करुन करायला हवे होते,चुकीचा पायंदा पडू नये असं मला वाटते,असंही आमदार बच्चू कडू म्हणाले.अपघातानंतर पहिल्यांदाच संभाजीनगर च्या दौऱ्यावर प्रहार प्रचारार्थ रवाना झाले आहे.