
दैनिक चालू वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे
सरस्वती शिशु मंदिर प्राथमिक विद्यालय मुखेडची शैक्षणिक सहल मुखेड येथील गोरक्षण संस्था मुखेडला भेट दिली असता त्यावेळी गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री माननीय सत्यवान अण्णा गरुडकर व सचिव श्री माननीय विरभद्र अप्पा स्वामी यांनीही या सहलीमध्ये पूर्ण वेळ उपस्थीत राहून विद्यार्थांना गोरक्षणची पूर्ण माहिती दिली.. गोरक्षण मध्ये गायींसाठी चारा व्यवस्था, पाण्याची व्यवस्था, गोमूत्र शेण विसर्जन व्यवस्था, गायी किती? बैल किती? वासरे किती त्यांची निगा कशी राखली जाते? त्याबद्दल माहिती, गोरक्षण शेतातील पिके, गडी, हौद, गोदाम तिथे चालणारे गोमुत्र अर्क, दंत मंजन, अनुदान, समिती, अशा सर्व गोष्टींवर संपूर्ण माहिती गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री माननीय सत्यवान अण्णा गरुडकर व सचिव श्री माननीय विरभद्र अप्पा स्वामी यांनी दिली…. याप्रसंगी विद्यार्थी अतिशय आनंदी वातरणात प्रसन्न होते. गायी बद्दल त्यांच्या मनात आणखी आस्था निर्माण झाल्याचे याप्रसंगी दिसून आले…. यावेळी गोरक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री माननीय सत्यवान अण्णा गरुडकर यांनी विद्यार्थांना गोष्टी सांगितले, शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. संगीता रणभिडकर यांनी विद्यार्थ्यांना गायी बद्दल माहिती सांगितली, तसेच सहशिक्षिका सौ. गंगा पवितवार यांनीही माहिती सांगितली व शेवटी बालाजी तलवारे सर यांनी ‘गोसेवा हिच ईश्वर सेवा’ सांगत गायींचे महत्व सांगितले, गायींचे संगोपन, पालन पोषण कसे करतात, गायी का जपले पाहिजे? सोबतच त्यांची निगा कशी राखली पाहिजे? याविषयी अतिशय छान माहिती सांगून सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले…. खुप उत्साहात व आनंदात शैक्षणिक व नैसर्गिक सहल पार पडली… शेवटी सहशिक्षक बालाजी तलवारे यांनी गोरक्षण संस्थेचे संचालक मंडळाचे आभार मानले……..