
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (नांदगाव पेठ) :– नांदगाव पेठ एमआयडीसीसाठी ३०-३२ वर्षांपूर्वी ज्या प्रकल्पग्रस्तांनी जमिनी दिल्या होत्या,ते अद्यापही वाढीव मोबदल्याच्या प्रतीक्षेत आहेत.एमआयडीसी किंवा शासनाचा अन्य कोणताही विभाग एक हजाराहून अधिक निवेदने देऊनही लक्ष देत नाही.त्यामुळे तीन दशकांपासून संघर्ष करणाऱ्या प्रकल्पग्रस्तांचे सर्व सीमा आता तुटू शकतात.अतिरिक्त MIDC -राज्य शासनाने नोकरीचे प्रलोभन दाखवून १९९३-९४ मध्ये नांदगाव पेठेतील विस्तारित एमआयडीसीसाठी मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या.त्यांना शेतीसाठी योग्य मोबदला दिला गेला नाही.ज्यातून आजही राजेश एन तायडे,उदयभान तेलंग,देविदास तंतरपाळे व इतर गेल्या २९ वर्षांपासून प्रति एकर २२ लाख रुपये वाढीव मोबदल्याचा लाभ मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत.त्यांच्यासोबत प्रफुल्ल तायडे,गंगाधर तायडे,दिनकर तायडे,कुसुम इंगोले,दुर्गा खांडेकर,सुदर्शन धाकडे,प्रवीण खंडारे आदी आहेत.या लोकांनी आतापर्यंत ५३५ वेळा जिल्हा प्रशासनाला निवेदने दिली आहेत.एमआयडीसीला हजार वेळा निवेदनेही दिली आहेत.शेतकऱ्यांना निधी देण्यास एमआयडीसीकडून दिरंगाई केल्या जात आहे.