
दैनिक चालू वार्ता हिमायतनगर प्रतिनिधी: राम चिंतलवाड
हिमायतनगर तालुक्यातील मौजे वारंग टाकळी येथील जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांना शालेय जीवनासोबतच व्यवहारिक ज्ञान मिळावे म्हणून आनंदनगरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यात विद्यार्थ्यांनी 22 स्टॉल उभारले होते दुपारी 2 वाजता या आनंदनगरीचा समारोप झाला विविध पदार्थाच्या विक्रीतून हजारो रुपयाची कमाई केली. शाळा व्यवस्थापक समितीचे अध्यक्ष व उपाध्यक्ष सरपंच यांच्या हस्ते उदघाटन करण्यात आले. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच व्यावहारिक ज्ञान मिळणे देखील गरजेचे असते यासाठी विद्यार्थ्यांना शिक्षणाबरोबरच व्यवसाय कसा करावा लागतो व त्यातून दोन पैसे मिळविताना कशा प्रकारे अडचणीला तोंड द्यावे लागते याचा अनुभव यावा म्हणून जिल्हा परिषद शाळेत आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात शाळेतील विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवीत आपली कला सादर करण्याचा प्रयत्न केला. मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी घरूनच साहित्य बनवून आणून शालेय आवारात स्टॉल लावले .विद्यार्थी खरेदी करण्यासाठी आलेल्या ग्राहकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत होते या मेळाव्याला एका प्रकारे यात्रेचे स्वरूप प्राप्त झाले होते. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक मुंडे सर,चिखले सर , बडेवाड मॅडम, मनगिरे मॅडम, त्यांनी विद्यार्थ्यांना चांगले मार्गदर्शन केले. वारंग टाकळी येथील पोलीस पाटील, सरपंच ,उपसरपंच, माजी सरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, रोजगार सेवक ,स्वस्त धान्य दुकानदार ,पत्रकार, ग्रामपंचायत सदस्य , व सर्व पालकांनी उपस्थित राहून सर्व विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला व खरेदी करून विद्यार्थ्यांना समर्थन केले.