
दैनिक चालु वार्ता हातकणंगले -कवि सरकार.इंगळी
२६ जानेवारी २०२३ रोजी साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे आधार प्रतिष्ठान उल्हासनगर, भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षा निमित्त २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिन अर्थात संविधान अंमलबजावणी दिन साजरा करण्यासाठी उल्हासनगर येथे आम्ही भारताचे लोक व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे दुर्मिळ छायाचित्र असणारी दिनदर्शिका २०२३ प्रकाशित होणार आहे. या संपूर्ण कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रा. डॉ. आनंद रत्नाकर आहिरे यांना अतिशय मानाचा महात्मा ज्योतिबा फुले विदयाभूषण पुरस्कार *महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंदे, मा. श्रीकांतजी शिंदे (खासदार,कल्याण लोकसभा ), मा जब्बार पटेल (निर्माता, दिग्दर्शक, नाटक, चित्रपट ) मान्यवरांच्या शुभहस्ते प्रदान होणार आहे.
प्रा. डॉ. आनंद रत्नाकर अहिरे हे परिवर्तनवादी सुप्रसिद्ध कवी, लेखक, शैक्षणिक, सामाजिक चळवळीत कार्य करणारे उच्चविद्याविभूषित असून ते आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमी चे संचालक आहेत त्यांनी आतापर्यंत १६ हजार विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन केले. त्यातून १५९४विद्यार्थी उत्तीर्ण झाले. तसेच पुष्परत्न जागतिक समुहाचे संस्थापक, अध्यक्ष, तसेच राष्ट्रीय कार्याध्यक्ष, अखिल भारतीय परिवर्तन मराठी साहित्य परिषद चे असून विश्व मराठी साहित्य परिषदेचे ते आजीवन सदस्य आहेत.
पुरस्कार जाहीर झाल्यामुळे राज्यभरातून अहिरे यांचे कौतुक होत आहे.