
दैनिक चालु वार्ता हातकणंगले -कवि सरकार इंगळी.
सोलगाव ता.राजापूर.जि.रत्नागिरी येथील सह्याद्री शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल सोलगाव या शाळेत शिक्षण महर्षी स्विस.गोंविदरावजी निकमसाहेब यांचे पुण्यतिथी निमित्य कै.सौ,सावित्री केरू गोंडाळ स्मृती ग्रंथालय उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याचे उद्घाटन प्रकाशयात्रीचे अध्यक्ष प्रा.विनोद गंगाराम मिरगुले यांनी केले. या कार्यक्रमास ,सखाराम कडू साहेब,गटशिक्षण अधिकारी पं.स.राजापूर, बी.के.गोंडाळ सहशिशक माध्यमिक विद्यालय जुवाठी,राजेंद्र तुकाराम बाईत,सचिवज्ञानसागर वाचनालय शिळं,तसेच प्रा.संतोष जोईल सर हे उपस्थीत होते.
यावेळी गावागावात ग्रंथालय चळवळ राबली पाहिजे असे मत प्रा.संतोष जोईल यांनी मांडले.व शाळेतील विद्यार्थी यांना मार्गदर्शन केले. शाळेचे मुख्याध्यापक दिनेश गोपाळ चौगुले यांनी स्वागत व आभार मानले.