
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी- नवनाथ यादव
भुम:-शासनाच्या निर्देशाप्रमाणे रब्बी हंगामातील ई पीक पाहणी 2.0.5 व्हर्जन ॲप प्ले स्टोअर मध्ये डाऊनलोड करून आपल्या मोबाईल द्वारे आपण प्रत्यक्ष शेतामध्ये जाऊन आपली पिक पाहणी नोंद ३१ जानेवारी २०२३ पर्यंत करण्याचे आवाहन तहसीलदार उषाकिरण शृंगारे यांनी केलं आहे. ई पीक पाहणी नोंदीचे शेतकरी यांना याचा फायदा पिक विमा, नैसर्गिक आपत्तीमध्ये पिकांचे नुकसान झाल्यास,तसेच बँक कर्ज व इतर पिकाच्या अनुषंगाने शासकीय योजनेचा फायदा होणार आहे. त्यामुळे आपली ई पिक पाहणीची नोंद मुदतीच्या आत तातडीने प्रथम करुन घ्यावी.तालुक्याचे काम अत्यंत असमाधानकारक आहे, तरी शासकीय, निम शासकीय कर्मचारी , शिक्षक वर्ग , खाजगी संस्था , सीएससी केंद्र चालक, सरपंच, पोलीस पाटील, सामाजिक संस्था ,शेतकरी यांनी जास्तीत जास्त सहभाग नोंदवून हे काम शंभर टक्के पूर्ण करावयाचे आहे.ज्या शेतकऱ्यांची पीक पाहणी राहिलेली आहे. अश्या शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास अडथळा निर्माण होऊ शकतो. तरी शेतकरी बंधूंनो लवकरात लवकर पीक पाहणी करून घ्यावी.