
दैनिक चालु वार्ता नवनाथ डिगोळे -चाकुर प्रतिनिधी
प्रजासत्ताक दिनानिमित्त घेतलेल्या विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा बक्षीस वितरण कार्यक्रम
_____________________________
चाकुर /चापोली : बक्षीस मिळालेल्या बालकांच्या चेहर्यावरील आनंद पाहून मी भारावून गेलो असे प्रतिपादन रमेश पाटील यांनी चापोली येथील जि. प. कें. प्रा. शाळेत ७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित केलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमा प्रसंगी बोलत होते.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी सहशशिक्षिका सविता स्वामी तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्तीचे अध्यक्ष प्रभाकर होनराव, शालेय समितीचे अध्यक्ष राम गादगे, अॅड.संग्राम पाटील, द्वारकानाथ गोरगिळे, बालाजी मद्रेवार, रमाकांत स्वामी, शिक्षक डी.ए.बरदाळे,पठाण एफ.झेड,सय्यद एस.के,तेलंग बी.बी उपस्थित होते.
रमेश पाटील यांनी बोलतांना सांगीतले की ,मिळवलेल्या बक्षीसाची किमंत ही पैशात मोजता येत नसल्याने मुलांना जास्तीचा आनंद होतो.चापोलीची जिल्हा परिषद शाळा बालकांच्या कला गुणांना वाव देणारी शाळा असून अभ्यासा बरोबरच विद्यार्थ्यांतील कला गुण जोपासणे महत्वाचे असते.ग्रामीण भागातील पालकांना आपला मुलगा- मुलगी डाॅक्टर किंवा इंजिनिअरच व्हावे वाटते. त्या अपेक्षेने ते मुलांना बोलत असतात त्यापेक्षा आपल्या मुलांना कोणत्या शिक्षणाची आवड आहे. हे जाणुन मुलांना शिक्षण दिले तर ते आधिक परिणाम कारक होवून मुले यशस्वी होतात. डाॅक्टर, इंजिनिअर झाली तर चांगलेच आहे परंतू जीवन जगताना त्यापलिकडे अजून विश्व असल्याची पालकांनी आपल्या मुलाला जाणीव करुन दिली तर लहानपणी ठेवलेल्या अपेक्षा भंग होणार नाहीत. म्हणुन पालकांनी दररोज नसले तरी किमान आठवड्यातून एक आपल्या पाल्यांच्या शिक्षकांची भेट घेवून मुलांचे अभ्यासाविषयी मत जाणुन घ्यावे.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन डी.ए.बरदळे यांनी केले कार्यक्रमास पालक, विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.