
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- जि. परिषद प्राथमिक शाळा खरकाडी तांडा ता .अहमदपूर जि. लातूर येथे ७४ वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आले . कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री पंडितराव राठोड तसेच प्रमुख पाहुणे नूतन ग्रामपंचायत सदस्य श्रीमती मीनाक्षीताई पौळ , दैनिक चालु वार्ता पत्रकार श्री राठोड रमेश पंडित , श्री शामराव राठोड,श्री रामराव राठोड,श्री भगवान राठोड, श्री संजय राठोड, श्री उत्तम राठोड हे नागरिक उपस्थित होते. सर्वप्रथम ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर तंबाखू मुक्तीची शपथ देण्यात आली त्यानंतर विद्यार्थ्यांनी भाषणे केली त्यानंतर उपस्थित मान्यवर व मुख्याध्यापक यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. तसेच यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध स्पर्धांमध्ये भाग घेतल्याबद्दल बक्षीस वितरण करण्यात आले.
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेचे मुख्याध्यापक श्री चोले एल पी यांनी केले सह शिक्षिका श्रीमती कांबळे एम एस यांनी सर्वांचे आभार मानले