
दैनिक चालु वार्ता तालुका प्रतिनिधी -विष्णू मोहन पोले
अहमद्पुर्: तालुक्यातील सुमठाणा येथिल् जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिनानिमित् शालेय व्यवस्थांपण समिती अध्यक्ष् वैभव नामपल्ले आणी मुख्याध्यापक चट जी.आर.यांच्या हस्ते ध्वज फडकवण्यात आला आणी गावकरी,विध्यर्थी यांनी राष्ट्रगीताच्या माध्यमातून मानवंदना दिली. विविध संस्कृतिक कार्यक्रमांच आयोजन केल होत.
सुमठाणा गावातील शाळा मध्ये दरवर्षी विविध् उपक्रम् राबविले जातात.या वर्षी प्रजासत्ताक दिन खूप जलोषात साजरा करण्यात आला.नृत्य,गायन,प्रबोधनपर भारोड, एकांकिका, नाटक,संगीत,भाषण असे विविध संस्कृतिक कार्यक्रम शाळेत प्रजासत्ताक दिना निमित्त शाळेच्या वतीन घेण्यात आले.
लहान मुलांच्या भाषणातून प्रजासत्ताक दिनाच महत्व आणी महापुरुषांच्या जीवनावर प्रकाश टाकण्याचं कार्य विद्यार्थ्यांनी केल.
या कार्यक्रमाच प्रस्ताविक मांडत असताना शाळेचे मुख्याध्यापक श्री चट जी. आर. यांनी प्रजासत्ताक दिनाच महत्व तसेच गावाला शाळेचा अभिमान असावा आणी शाळेला गावाचा आधार असावा अश्या पद्धतीन गाव आणी शाळा यांच्या मधील प्रेम आणी सलोखा गावातील विद्यार्थ्यामधील गुणात्मक,संख्यातमक,बद्दल करण्यासाठी गाव आणी शाळा यांनी काय केल पाहिजे या बदलच मार्गदर्शन केल.आणी त्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल कला गुण आपल्या संस्कृतिक कार्यक्रमातून दाखवून दिले, या मध्ये मुसळे तुषार,नानाराव पोले,श्रुती गायकवाड,नामपल्ले युवराज,विराज शिंदे,स्वाती गायकवाड,आणी इतर सर्व विध्यार्थी यांनी भाषण,नृत्य,आणी इतर कला गुण दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवाण्याचं कार्य केल.या विध्यर्थ्यांना मार्गदर्शन करण्याचं कार्य ,कांबळे सर,पोसाने मॅडम,मामीलवाड मॅडम यांनी केल.या बद्दल गावकर्यांच्या वतीने सर्व शिक्षकान्च् अभिनंदन,कौतुक केल जात आहे.
आजच्या या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष् वैभव नामपले होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गावच्या प्रथम् नागरिक सरपंच जिजाबाई पोले,गणेश भाऊसाहेब पोले,विश्वनाथ पोले,भगवान पोले,माजी सैनिक माधव मुसळे,प्रशांत मुसळे,बळीराम,पोलिसपाटील चंद्रहास हमणे, बाबुराव पोले ,पत्रकार विष्णू पोले,भरत् पोले ,गंगासागरबाई शिंदे,विजयमाला बाई मुसळे,दगडू मुसळे, नंदराज पोले, दिगंंबर पोले, गंगाराम पोले, लाईट व्यवस्थापनाच कार्य महारुद्र मुसळे यांनी हाताळले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पोसाने मॅडम यांनी केले या कार्यक्रमाला सर्व ग्रामस्थ आणी विद्यार्थी ,महिला यांची उपस्तीथी होती शेवटी कांबळे सर यांनी आभार मानले यांनी कार्यक्रमाची सांगता केली.