
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनीधी – माधव गोटमवाड
कंधार – जनता माध्यमिक विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालय दगड सांगवी ते प्रजासत्ताक दिनानिमित्त विविध क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले होते त्याचे भव्य बक्षीस वितरण व मानव विकास मिशन अंतर्गत इयत्ता आठवी वर्गातील मुलींना सायकलीचे वाटप हा भव्य कार्यक्रम शाळेच्या प्रांगणात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी
दगड सांगवी नगरीचे माजी सरपंच सूर्यकांत गणपतराव फाजगे होते. तर प्रमुख उपस्थिती शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष शिवाजीराव फाजगे दगड सांगवीचे नवनिर्वाचित तरुण तडफदार सरपंच प्रदीप बाळासाहेब फाजगे ,चेअरमन मनोहर पांडे,ग्राम विस्तार अधिकारी कठारेसाहेब,व संस्थापक सुरेश फाजगे हे होते तर विशेष उपस्थिती. उपसरपंच प्रतिनिधी सुधाकर गोरे माजी सरपंच संतराम ढवळे ग्रामपंचायत सदस्य पांडुरंग फाजगे, माधवराव ढवळे,ग्रा.प. स. प्रतिनिधी हानमंत कल्हाळे, रमेश आडकुटे, धारबा गोरे,कचरु फाजगे,
अनिता बामनवाड,शाहाजी फाजगे, रामा देवकते, सदाशिव फाजगे,भिमराव तोरणे, नागोराव हाके,राम दुटके, संतोष मोरतळे, उद्धव चव्हाण ,मोतीराम जाधव, देवराव गोरे, मुअ पाटील सर ,मरशिवणे सर, नंदा मॅडम,प्रभा मॅडम सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
कचरु पाटील,व्यंकट फाजगे,संदिप सोनवणे, मनोज फाजगे
प्रजासत्ताक दिनानिमित्त ज्या क्रीडा स्पर्धा आयोजित केल्या होत्या त्या चे बक्षिस वितरण अध्यक्ष व प्रमुख उपस्थिती यांच्या हस्ते झाले. त्यानंतर शाळेची दहाव्या वर्गातील विद्यार्थ्यांनी अंजली जाधव हिची उंच उडी क्रीडा स्पर्धेत राज्य स्तरावर निवड झाल्यामुळे दगसांगवीचे नव निर्वाचित सरपंच प्रदीप पाटील फाजगे यांच्या तर्फे 1100 ची बक्षीस देऊन पालकांसह सत्कार करण्यात आला.मानव विकास योजनेअंतर्गत दरवर्षी बाहेर गावाहून शाळेला अपडाउन करणाऱ्या आठव्या वर्गातील 24मुलींना मान्य वरांच्या हस्ते सायकलचे वाटप करण्यात आले .
त्यानंतर शाळेचे प्राचार्य मोहन फाजगे यांनी प्रास्ताविक करुन शाळेची गुणवत्ता पॅटर्न चार आढावा घेतला.व शाळा ही गावकऱ्यांच्या व पालकांच्या सहकार्यातुनच घडत असते त्यासाठी सहकार्य करावे
आहे आव्हान केले.
नंतर ग्रामपंचायत तर्फे विद्यार्थ्यांसह सर्वाना भोजणाची व्यवस्था करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आर.जी.सुर्यवंशी यांनी तर
आभार श्रीराम फाजगे यांनी केले.