
दैनिक चालू वार्ता निलंगा ता.प्रतिनिधी- इस्माईल महेबूब शेख
=====================
निलंगा : दिनांक 26/01/2023 रोजी मौजे शिऊर ता. निलंगा येथ 74 राव्या प्रजासत्ताक दिनानिमित्य आंबेडकर चौक शिऊर येथे दरवर्षी प्रमाणे देशभक्त रिटायर फौजी मेजर मधुकर अभंगराव बिरादार यांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास गावातील जिल्हा परीषद शाळेतील सर्व शिक्षक आणि विध्यार्थी यांची रॅली लेझीम आणि घोषणा देत आंबेडकर चौक येथे आली, आणि ध्वजारोहणास शालेय मुलांनी राष्ट्रगीतासह सलामी दिली. तसेच गावचे सरपंच श्री भानुदास सूर्यवंशी उपसरपंच श्री शेषेराव बंडगर आणि गावातील वरिष्ठ मान्यवर उपस्थित होते. झेंडा वंदनाचा कार्यक्रम शांततेत आणि जयघोषात संपन्न झाला, परंतु प्रशासनाच्या दुर्लक्ष्या मूळे प्रती वर्षाप्रमाणे याही वर्षी आंबेडकर चौकातील घाण साफ करून गटाराच्या बाजूला कार्यक्रम संपन्न झाल्यामुळे कार्यक्रमास आलेले नागरीक यांनी, ग्रामपंचायत चे सरपंच सदस्य आणि शासकीय कर्मचारी यांच्यावर नाराजी वेक्त केली.