
दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनीधी-विष्णू मोहन पोले
राष्ट्रीय किसान मोर्चा या शेतकरी संघटनेच्या अहमदपूर तालुका अध्यक्ष पदी संतोष रेड्डी (भसमपूरे)यांची नियुक्ती श्री दिपक इंगळे पाटील (प्रदेश अध्यक्ष राष्ट्रीय किसान मोर्चा महाराष्ट्र)यांनी केली आहे .श्री संतोष भसमपुरे हे दैनिक चालू वार्ता चे खंडाळी सर्कल प्रतिनिधी आहेत.
राज्यातील शेतकरी वर्गाच्या अनेक अडचणी असून त्याविरुद्ध आवाज उठवण्याची तयारी आता राष्ट्रीय किसान मोर्चा या संघटनेने केली आहे .शेती वीजबिल घोटाळा,MSP कायद्याबाबत गावोगावी जाऊन शेतकरी वर्गात जागृती करून त्यांना संघटित करण्याचे काम राष्ट्रीय किसान मोर्चा गेल्या दोन वर्षांपासून करत आहे.संघटित झाल्याशिवाय शेतकऱ्यांच्या अडचणी सुटणार नाही आणि त्यांना न्याय मिळणार नाही ,संघटित होऊन संघर्ष केल्याशिवाय त्यांच्या समस्या सुटणार नाहीत ही वस्तुस्थिती शेतकरी वर्गाने समजून घेतली पाहिजे असे मत राष्ट्रीय किसान मोर्चाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री दिपक इंगळे पाटील यांनी व्यक्त केली ..महावितरण कंपनीने शेतकऱ्याकडून आजवर जी वीजबिल वसूल केली ती शेतकऱ्यांची फसवणूक असल्याचे त्यांनी सांगितले.365 दिवसात 120 दिवस शेतकरी विजवापर करत असतात मग 365 दिवसाचे वीजबिल शेतकरी वर्गाकडून वसूल कोणत्या आधारावर केले जाते यावर महावितरण कडे उत्तर नसल्याचे त्यांनी सांगितले.2003 पासून ते आजतागायत महाराष्ट्र सरकार शेतकऱ्यांचे वीजबिल भरत आले आहे आणि यंदा म्हणजे 2022 चे चार हजार कोटी रुपये शासनाने भरणा केला असून देखील महावितरण शेतकऱ्यांची विज कट करून मुघल पद्धतीने वसुली करत आहे. त्याविरुद्ध राष्ट्रीय किसान मोर्चा महावितरण कंपनीच्या विरोधात शेतकरी वर्गाच्या बाजूने ठाम उभा आहे असे निवड कार्यक्रमात मार्गदर्शन करताना सांगितले.सदर कार्यक्रमात प्रोटॉन चे श्री सतीश ननीर, श्री परमेश्वर पोले रंजीत क्षीरसागर तसेच गावातील शेतकरी उपस्थित होते.