
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
नांदेड:कंधार :- कंधार तालुक्यातील कळका गावातील देवाला सोडलेली मोकाट जनावरे यांच्या वाढत्या संख्येमुळे गाव वस्तीत शाळकरी मुलांवर,वृधावर, महीला वर हमले होत असून शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांची प्रचंड प्रमाणात नासाडी होत आहे.परीणामी जिवीत हानी होण्याची परीस्थिती निर्माण झाली आहे.तसेच शेतकऱ्यांना पिकांचे नुकसान होत आहे.गावात मोकाट कुत्रे हल्ला करून चावत आहेत.रानामध्ये रानडुक्करे पिकांचे अतोनात नुकसान करीत आहेत.वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी रानडुक्करांचा कांही तरी बंदोबस्त करावा व सरपंच साहेब आणि ग्रामविकास अधिकारी साहेबांनी गावातील लोकांना होणारे नुकसान व त्रास टाळण्यासाठी मोकाट कुत्रे,जनावरे,रानडुक्करे यांचा बंदोबस्त करावा असे आवाहन बळीराम जेजेराव, सुधाकर सुर्यकांत,राहूल प्रभाकर,उमेश हनमंत,मोहन विश्वनाथ, तानाजी शंकर,अनिल उत्तमराव, गोविंद ग्यानोबा, देविदास विठ्ठल, मारोती रामराव, व्यंकटी मोतीराम, सतिश प्रल्हाद, दत्ता रामकिशन, रामकिशन विठोबा, रामदास, अर्जुन पंडित जाधव,प्रताप, हनमंत,आकाश, बालाजी, मधुकर व्यंकटराव, मुरलीधर, भगवान मारोती, व्यंकटराव गणपतराव चेअरमन, विलास रामराव पोलिस पाटील यांनी निवेदन देऊन बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.