
दैनिक चालु वार्ता अमरावती प्रतिनिधी-श्रीकांत नाथे
अमरावती (अंजनगाव सुर्जी) :- एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत शासनाने अंगणवाडी सेविका आशा वर्कर मार्फत सर्वेक्षण सुरू केलेले आहे.आरोग्य सर्वेक्षण करण्याकरिता गेलेल्या आशा वर्करला मारहाण झाल्याची घटना तालुक्यातील रशीदपुर येथे अंजनगाव सुर्जी पो.स्टे.मधून माहिती प्राप्त झाली.अगोदरच जिल्हाभर अंगणवाडी सेविकांचे प्रश्न शासनानेच मार्गी न लावता आता काही समाजकंटक सुद्धा आशा वर्कर सोबत हातापायी करीत आहेत.ही घटना दुसरी कुठली नसून अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी पोलीस स्टेशन हद्दीतील दहिगाव परिसरातील रशीदपूर येथे घडली आहे.सदर घटना दिनांक २४ जानेवारी २०२३ रोजी १२:३० च्या सुमारास रशीदपूर येथे घडली असून या प्रकरणी अंजनगाव सुर्जी पो.स्टेशन मध्ये आरोपी शालिकराम नारायण लोंदे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर प्रकरण असे की,भारत सरकारच्या सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाच्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालय द्वारे दिनांक १९ ते २६ जानेवारी २०२३ पर्यंत सर्वेक्षण चालणार होते.दरम्यान या कालावधीसाठी सामाजिक आर्थिक सर्वेक्षण करण्यासाठी सदर आशा वर्कर व अन्वेक्षक हे दहिगाव परिसरातील रशीदपूर येथे गेले असता शालिकराम लोंदे याने आशा वर्कर सोबत असलेले अन्वेषक यांना आवाज दिला आणि आशा वर्कर बद्दल उलट-सुलट सांगितले.त्यानंतर अंगणवाडी सेविकेला शिवीगाळ केली आणि एवढ्यातच न थांबता आशा वर्करला लाथाभुक्क्यांनी मारहाण केली तसेच जीवे मारण्याची सुद्धा धमकी आरोपी शालिकराम याने दिली.सदर आशा वर्करला रूग्णालयात दाखल केले असता कान,नाक,घसा चे डॉक्टर उपलब्ध नसल्याने डॉक्टरांनी आशा वर्करला अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रेफर करण्यास सांगीतले.तत्पूर्वी सदर प्रकरणी आशा वर्कर यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध अंजनगाव सुर्जी पोलीसांनी भारतीय दंड संहिता १८६० नुसार ३२३,५०४,५०६ अन्वये गुन्हा दाखल केला असून घटनेचा पुढील तपास ठाणेदार दिपक वानखेडे यांच्या मार्गदर्शनात पोलीस करीत आहे.
*न्याय द्या आशा वर्कर यांची मागणी*
२६ जानेवारी रोजी आशा वर्कर यांनी तहसील कार्यालयावर धडक दिली असता आम्हाला न्याय द्या व दोषी इसमावर कारवाई करा.जोपर्यंत आम्हाला न्याय मिळणार नाही तोपर्यंत कामबंद आंदोलन सुरू ठेवणार असल्याचे तहसीलदार यांना निवेदन द्वारे मागणी तालुक्यातील आशा वर्कर मार्फत करण्यात आली.
चौकट
—————————————-
*बालविकास विभाग गप्प बसणार की कारवाईत उतरणार*
सध्यपरिस्थिती पाहता मानधन/वेतन वाढ आणि शासकीय मिळालेले मोबाईल खराब झाल्याने अंगणवाडी सेविकांचा संघर्ष संपता संपेना.अंगणवाडी सेविका,आशा वर्कर कोरोना प्रादुर्भाव असो की कुपोषित बालके ती आपल्या अंगणवाडी मार्फत दिल्या गेलेल्या कामात दिवसभर व्यस्त असते.वाढलेल्या महागाईमुळे ती तिला मिळणाऱ्या पगारात घर चालवू शकेल एवढा पुरेसा नाही आहे.एकीकडे इतर शासकीय वर्गाच्या पगारात भरमसाठ वाढ शासन करतेय आणि अंगणवाडी सेविका तसेच आशा वर्कर ला फक्त ३ ते ५ हजार पगार मिळतो.म्हणून अंगणवाडी सेविका व आशा वर्कर फक्त “बिन पगारी फुल अधिकारी” आहेत असे म्हणायला काही हरकत नाही.आता ह्या घडलेल्या प्रकरणात एकात्मिक बाल विकास विभाग कितपत हस्तक्षेप करेल याकडे नागरिकांचे लक्ष केंद्रित होऊ लागले आहे.