
दैनिक चालु वार्ता मुखेड प्रतिनिधी-सुरेश जमदाडे
मुखेड येथील प्रसिद्ध असलेले स्कॉलर किड्स इंटरनॅशनल स्कूल मध्ये 74 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेचे संचालक ज्ञानेश्वर पाटील पवळे यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले. त्यानंतर नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, कार्यक्रमाचे उद्घाटन उपनिरीक्षक नरहरी फड यांच्या हस्ते करण्यात आले. या स्पर्धेत नर्सरी ते 5th च्या विद्यार्थ्यांनी पूर्ण तयारीने सहभाग घेतला होता. देशभक्तीपर आधारित गीतावर विद्यार्थ्यांनी वेशभूषासह नृत्य सादर केले. यात देवा श्री गणेशा, वंदे मातरम, देश रंगीला,या गाण्यावर पालक व प्रेक्षकांनी खूप मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. शेवटच्या टप्प्यात डॉ. रणजीत काळे,उपनिरीक्षक नरहरी फड, रामदास पाटील,शिवकुमार बिरादार, इत्यादी मान्यवरांच्या हस्ते, खेळात प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थ्यांना बक्षीस देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
या कार्यक्रमाला उपस्थित, शैलेंद्र हिवराळे, मोरे सर, अरविंद हिवराळे, शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक , पालक इत्यादींचा समावेश होता.