
दैनिक चालू वार्ता नांदेड / प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
श्री शिवाजी ज्युनिअर कॉलेज माणिक नगर नवीन , कौठा नांदेड शैक्षणिक वर्ष 2022 – 23 ची शैक्षणिक सहल शाळेचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुधीर भाऊ गुरुनाथराव कुरुडे व शालेय समिती सदस्य मा.श्री सूर्यकांत कावळे यांच्या परवानगीने कॉलेजचे उपप्राचार्य परशुराम येसलवाड यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 27 जानेवारी 2023 रोजी हिंगोली जिल्ह्यातील विविध वैज्ञानिक स्थळांना भेटी देण्यासाठी फिशरी विभागाच्या गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन शास्त्रा अंतर्गत मत्स्य बीज उत्पादन केंद्र मौजे भाटेगाव तालुका कळमनुरी येथे अभ्यास दौऱ्यासाठी सहलीचे नियोजन करण्यात आले. . या सहली दरम्यान गोड्या पाण्यातील मत्स्य संवर्धन शास्त्र विभागाचे एकूण सर्वच विद्यार्थी सहलीचा आनंद घेण्यासाठी व सहली दरम्यान अभ्यास करण्यासाठी गेले असून यांच्या समवेत फिशरी विभागाचे प्रा. शेख उमर , जीवशास्त्र विभागाचे प्रा. शिवानंद सोनटक्के , भौतिकशास्त्र विभागाचे प्रा. शेख रेशमा , समाजशास्त्र विषयाच्या प्रा. दुलेवाड वैशाली यांचा समावेश असून यादरम्यान सहल ही निर्विघ्न पूर्ण होण्यासाठी व सहलीचा आनंद घेण्यासाठी शाळा व कॉलेजचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुधीर भाऊ कुरुडे उप प्राचार्य परशुराम येसलवाड यांच्यासह प्राध्यापक बंधू आणि भगिनी यांनी आनंदी प्रवासास व आनंदी सहलीस शुभेच्छा दिल्या