
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- प्रजासत्ताक दिनी महात्मा फुले प्राथमिक विद्यालयात भारताचा 74 वा प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यालयाचे मु.अ.श्री.मुसणे साहेब यांनी भारताचे राष्ट्रपिता महात्मा गांधी आणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पुजन करून त्यांना अभिवादन केले त्यानंतर ध्वजारोहण करून सर्व विद्यार्थी आणी शिक्षकानीं राष्ट्रगान गाऊन राष्ट्राला वंदन केले तशेच यावेळी वर्ग 4 थी ‘क’ मधील विद्यार्थिनी विशाखा उगीले व रिद्धी जावरे या विद्यार्थिनींनी देशभक्तीपर गित सादर करून देशभक्ती जाग्रुत करणारे वातावरण निर्माण केले तद्नंतर प्रजासत्ताक दिनानिमित्य विद्यालयात घेण्यात आलेल्या मैदानी व सांस्कृतिक स्पर्धांचा * *बक्षीस वितरण सोहळा* पार पडला या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यालयाचे मु. अ. श्री. मुसणे सर तर प्रमूख पाहुणे म्हणून जि. प. चे माजी मु. अ. श्री. नरवटे सर हे होते या वितरण सोहळ्याचे सूत्रसंचलन सांकृतिक विभाग प्रमुख शेळके सर यांनी केले बक्षीस वितरण सोहळा अगदी उत्साहात साजरा झाला या कार्यक्रमासाठी आलेल्या सर्व पालकांचे विद्यालयाच्या वतिने आभार स.शि. परांडे सर यांनी मांडले शेवटी विध्यार्थ्यांना विद्यालयाच्या वतिने केळी वाटप करण्यात आली….