
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर: देगलूर तालुक्यातील मरखेल येथील स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचे वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण सोहळा उत्साहास पार पडला .या कार्यक्रमाचे उदघाटन मा. बबनराव पाटील गोजेगावकर यांनी केले व्यासपीठावर प्रमुख पाहुणे सरपंच मच्छिंद्र गवाले,पोलीस निरीक्षक गुट्टे साहेब ,सहाय्यक पोलीस निरीक्षक मद्दे साहेब,डॉ. शंकर धमनसुरे साहेब उपस्थित होते.शाळेतील एलकेजी,युकेजी व नर्सरी या विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते,बालगीते, आदी गीतावर वैयक्तिक व सामूहिक नृत्य सादर करून पालकांची व प्रेक्षकांनी मने जिंकली. गुणवंत व विविध स्पर्धेमध्ये यश मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला.विद्यार्थी जीवनात अशा कार्यक्रमामुळे वैयक्तिक विकास होतो असे बबन पाटील गोजेगावकर म्हणाले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीपदा मुळे यांनी केले तर सूत्रसंचालन प्रा, मनोहर मुळे यांनी व आभार प्रदर्शन गौस शेख यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहशिक्षक कल्पे संदीप व ऋतुजा मोरगे यांनी सहकार्य केले.