
दैनिक चालु वार्ता पुणे शहर प्रतिनिधी- विशाल खुणे
दि 26 जाने पुणे (पिंपरी )
पिंपरी येथील संत तुकाराम नगर मधील कामगार कल्याण केंद्रात प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. स्वतंत्र्याच्या अमृतमोहोत्सव हर घर तिरंगामुळे भारतभर देशभक्ती जागृत होत आहे. 1950 ला संविधान दिन लागू झाले पूर्ण स्वराज्य घोषित करण्याच्या तारखेला आपण प्रजासत्ताक दिन म्हणून करण्यात येते तो हाच दिवस आहे.
यावेळी गुणवंत कामगार अण्णा जोगदंड म्हणाले की कामगार कल्याण मंडळांनी शिष्यवृत्ती योजना, परदेश उच्च शिक्षण योजना, क्रीडा शिष्यवृत्ती, सह विविध पुरस्कार, नाट्य स्पर्धा, भजन स्पर्धा, कबड्डी स्पर्धा, शिवण क्लास ,शिशु मंदिर, वैद्यकीय अर्थसाह्य ,रोजगार मेळावा, यूपीएससी, एम.पी.एस.सी स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन शिबिर याचबरोबर आरोग्य शिबिर, फॅशन डिझाईन, कराटे प्रशिक्षण, योगा वर्ग,चित्रकला, ब्युटी पार्लर सारखे वर्ग अशा प्रकारचे उपक्रम हे स्थानिक कामगाराच्या मागणीनुसार उपक्रम मंडळ राबवीत असल्याचे जोगदंड यांनी सांगितले. पुढे बोलताना ते म्हणाले की “आमचे व कामगार कल्याण मंडळाचे नातेही कौटुंबिक झाले आहे, आम्ही सर्वजन कामगार कल्याण मंडळाच्या उपक्रमामध्ये हिरीरीने भाग घेत असतो”.
केंद्राच्या उपसंचालिका सुरेखा मोरे म्हणाल्या की भारत मातेची संरक्षण करताना बलिदान देणाऱ्या शूरवीरांना यावेळी श्रद्धांजली वाहिली .आणि त्यांच्या कार्याची माहिती देण्यात आली. यावेळी जास्तीत जास्त कामगारांनी या केंद्राचे सभासद होण्याचे आवाहन करण्यात आले .
यावेळी डायनोमर्कचे विभाग प्रमुख हेमंत नेमाडे म्हणाले की “भारताची जगात पाचवी क्रमांकावर अर्थव्यवस्था आली आहे. भारतीय नागरीकानी पहिल्या क्रमांकावर येण्यासाठी अधिक अधिक सर्व क्षेत्रात सहभाग नोंदवला पाहिजे”.
प्रमुख पाहुण्यां बाल हक्क कार्यकर्त्या डॉ यामीनी आडबे म्हणाल्या कि “उद्याचा भारत घडवण्यात जास्तीत जास्त स्त्रिया योगदान देतील यात शंका नाही. जोपर्यंत भीक मागणारे लहान लहान मुले मुख्य प्रवाहात येत नाहीत तो पर्यंत भारत महासत्ता होईल असे मला वाटत नाही प्रत्येकाच्या घरात योद्धा तयार झाला पाहिजे. असे मत व्यक्त केले”.
डि.वाय.पाटीलचे सब रजिस्टार राम डोके म्हणाले कि “भारत देश एक जगातील असा देश आहे कि घोडदळ आहे याला 61 कँव्हेलरी म्हणून ओळखले जाते अशा देशात आपण राहतो याचा आपणा सर्वांना आभिमान वाटतो.तरुणांनी नोकरीच्या मागे न लागता नोकरी देणारे हात आधिक झाले पाहीजेत असे मत व्यक्त केले.
यावेळी केंद्र संचालक किरण कोळेकर यांनी मंडळाने वर्षभर लाभलेल्या उपक्रमांची माहीती दिली. आयूश नेमाडे या विद्यार्थ्यांने पियानो वर देशभक्तीपर गिते गायले.
महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने अरुण इंगळे यानी पर्यावरणाची शपथ दिली.
यावेळी गुणवंत कामगार आण्णा जोगदंड, महीला अध्यक्षा संजना करंजावणे, केंद्र संचालक अनिल कारळे कोळेकर, पश्चिम महाराष्ट्र महीला अध्यक्षा संगिता जोगदंड, केंद्र उपसंचालिका सुरेखा मोरे, हेमंत नेमाडे , गुणवंत कामगार शिवराम गवस, शंकर नानेकर, किरण देशमुख, काळुराम लांडगे, शामराव गायकवाड, कवी शामराव सरकाळे, ईश्वर सोनोने, पंडीत वनसकर, प्रकाश घोरपडे, यादव तळोले, सुदाम शिदे, किरण कोळेकर, आभिजीत ओव्हाळ, बबन मगर, संगीता क्षिरसागर, शैलेजा अवडे, ईत्यादी मान्यवर उपस्थित होते.