
दैनिक चालु वार्ता : पुणे शहर प्रतिनिधी : जब्बार मुलाणी
—————————————-
पुणे – खडकी
खडकीतील लाल बहादूर शास्त्री हायस्कुलचा माजी विदयार्थी व माझी शिक्षक मेळावा २६ जानेवारी २०२३
खडकीतील कॅन्टोमेंट बोर्डाच्या लाल बहादूर शास्त्री हायस्कुल ही गोरगरीब मुला मुलींची शाळा म्हणून ओळखली जाते. शाळेची स्थापना १९६५ रोजी करण्यात आली. तेव्हा पासून या शाळेतील मुले अनेक मोठं मोठ्या पदांवर विराजमान आहे. अशा या शाळेचा माझी शिक्षक व माजी विद्यार्थी यांच्यात एकमत होऊन २६ जानेवारी २०२३ रोजी मेळावा उत्साहात पार पडला. या भव्य मेळाव्यास १४३९ विद्यार्थी सहभागी झाले होते. असे माजी विद्यार्थी मेळाव्याचे आयोजकांनी सांगितले आहे.
या मेळाव्याची सुरवात माझी शिक्षकांची ढोल तशाच्या गजरात मिरवणूक काढून स्टेज वर नेण्यात आले. प्रमुख अध्यक्ष व माझी मुख्याध्यापक कालिदास पेंडलवार सर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व सरस्वती विद्येची पूजा करून मेळाव्याची सुरवात करण्यात आली. तसेच प्रार्थना करण्यात आली करोना काळात निधन झालेल्या विध्यार्थ्यांना श्रद्धांजली वाहन्यात आली. तसेच सर्व माझी शिक्षकांचे सत्कार कारण्यात आले. यावेळी मेळाव्याचे सूत्रसंचालन उषा साळवे, अल्पना चव्हाण, विजय चौरे, स्वागत अध्यक्ष भारत दौंडकर सर, व आभार अल्पना चव्हाण यांनी केले.