
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी आर्णी-श्री, रमेश राठोड
“”””””””””””””””‘”””””””””'””'”””””””””’ आर्णी तालुक्यात येत असलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक १ या अंतर्गत येत असलेल्या सावळी ते पाळोदी रस्त्याची अवस्था अत्यंत दैनंदिन झाली या रस्त्याने पायदळ चालने सुध्दा कठीन झाले आहे याच गावात आदिवासी आश्रम शाळा आहे या शाळेमध्ये दूरदूरचे विद्यार्थी शिक्षण घेत आहे त्यामुळे त्या पालक वर्गांना मुलांना भेटण्याकरिता जाण्याकरिता विचार येतो की गाडी चालवणे सुद्धा कठीण झाले आहे हे गाव पेसातर्गत असल्याने या गावालाच लागून जरांद्री हे गाव आहे या दोन्ही गावाला हा एकच रस्ता आहे काही दिवसा आधी या रस्त्याचे काम झाले पहिले कोटिंग टाकून ठेकेदार पसार झाले तर काही अधूरे सोडून ठेकेदार पसार झाले नाहिनां अशी शंका आता नागरिक करीत आहे, शासनाच्या वतीने आदिवासी समाजाच्या विकासाकरिता कोट्यवधी नीधी खर्च करतो पन या रस्त्यावरून असे समजते की हा फक्त देखावा तर नाही ना पाळोदी व जलांर्दी या गावांना मधे आदीवासी बहुल समाज वास्तव्यास असुन सुध्दा शासन दखल घेत नसल्याने रोष व्यक्त केल्या जात आहे या रोड विषयी शाखा अभियंता यांना दुरध्वनी केला असता साहेबांनी फोन उचलला नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहे, तरी शासनाने त्वरित दखल घेऊन सावळी ते पाळोदी रस्त्याचे काम सुरु करावे अशी मागनी परीसरातुन होत आहे,