
दैनिक चालु वार्ता अहमद्पुर प्रतिनीधी.-विष्णु मोहन पोले
मौजे धसवाडी तालुका येथील लोकप्रिय उप सरपंच श्री लखनभैया घोडके यांनी नुकताच स्वतःच्या पैशाने धसवाडी ते नवीन महादेव मंदिर रस्त्याचे काम गावकऱ्यांच्या विनंतीवरून सुरुवात केली असून स्वतः निगराणी खाली त्या रस्त्याची पाहणी त्यांनी केली . महादेव मंदिराच्या दर्शनाकरिता ये जा करणाऱ्या भाविकांना होणारा त्रास लक्षात घेता मंदिर कमिटीने उप सरपंच श्री लखनभैया घोडके यांना या कामाबाबत विचारणा केली असता ,क्षणाचाही विचार न करता करू असा शब्द दिला आणि दुसऱ्याच दिवशी कामाला सुरुवात केली .शब्द पाळणारे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध असणारे लखनभैया घोडके यांचे कौतुक भाविक भक्त आणि गावातील नागरिक करत आहेत