
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -मानिक सुर्यवंशी.
——————————-
“परीक्षा पे चर्चा” या उपक्रमांतर्गत घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय चित्रकला स्पर्धेत शिवशंकर माध्यमिक विद्यालय वन्नाळीची विद्यार्थिनी कु.ऋतुजा मारुती वाघमारे ही तालुक्यातील 733 स्पर्धकातून ती तालुक्यातून सर्व व्दितीय आली.
तालुक्याचे आमदार मा.जितेश भाऊ अंतापुरकर,प्रभारी उपजिल्हाधिकारी गिरी साहेब,तहसीलदार राजाभाऊ कदम साहेब,नायब तहसीलदार मिठेवार साहेब,देगलुर नगरपालिकेचे सिईओ ईरलोड साहेब गटविकास अधिकारी पं.स.देगलूर चे मा.शेखर देशमुख सर,शिक्षणाधिकारी अधीक्षक राजकुमार जाधवर सर शिक्षण विस्तार अधिकारी तोटरे सर,झंपलवार सर,केंद्रप्रमुख किसवे सर आदि मान्यवरांच्या उपस्थितीत ऋतुजा वाघमारे व पालकाचा 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून तिला प्रशस्तीपत्र,रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले.या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा.माजी मंत्री तथा खासदार भास्कररावजी पाटील खतगावकर साहेब,संस्थेचे सचिव बाळासाहेब पाटील खतगावकर, डॉ.सौ.मिनलताई पाटील खतगावकर,यांनी तिचे विशेष कौतुक केले.शाळेचे मुख्याध्यापक श्री सुरेश वानंजे,माधव कदम राजेश बामणे,आनंद दिमलवाड,धनाजी मोरे,दिगंबर खिसे,,बालाजी पेटेकर,सौ.अंजली देशमुख,बालाजी बारडवार,दिलीप पाटील,मारुती अंकमवार मामा,अदिनी तीचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे संचालन सुवर्णकार साहेब यांनी केले तर आभार केंद्रप्रमुख किसवे सर यांनी मानले. तिला कलाध्यापक बालाजी पेटेकर,यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल परिसरातील सर्व पालक वर्गातून विशेष कौतुक होत आहे