
दै.चालु वार्ता नांदेड – प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव
( ग्रा.पं.दिग्रस बु. व प्रा.यानभुरे जयवंत सोपानराव यांच्या प्रयत्नाना यश )
महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग 50 हा नांदेड उस्मान नगर – कंधार – दिग्रस बुद्रुक – जांब – जळकोट मार्गे उदगीर ते कर्नाटक राज्यातील होस्पेट पर्यंतच्या राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्णत्वाला गेले असून गेल्या अनेक दिवसापासून दैनिक चालू वार्ता या वृत्तपत्राच्या माध्यमातून व यापूर्वी दैनिक विष्णुपुरी एक्सप्रेस या वृत्तपत्रात काम करत असताना त्या वृत्तपत्राच्या माध्यमातून वारंवार कंधार तालुक्यातील दिग्रस बु. येथे सर्विस रोडच्या कामाची मागणी वृत्तपत्राचे नांदेड प्रतिनिधी प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव यानी वारंवार केली होती त्यामुळे त्या दोन्ही वृत्तपत्राच्या मागणीला व प्रा. यानभुरे जयवंत सोपानराव यांच्या प्रयत्नांना आज प्रत्यक्षात यश आलेले दिसून आले. . दैनिक चालू वार्ता या वृत्तपत्राच्या माध्यमातून व दैनिक विष्णुपरी एक्सप्रेस या वृत्तपत्राच्या माध्यमातून वारंवार दिलेल्या बातम्याचे अवलोकन करून दिग्रस बु. ग्रामपंचायत कार्यालयाने अर्थातच दिग्रस नगरीचे सरपंच सौ.दिशा साहेबराव नाईकवाडे व माली पाटील तथा विद्यमान उपसरपंच शंकरराव धोंडीबा पाटील व सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन तथा विद्यमान ग्रामपंचायत सदस्य सुनील मधुकरराव चिद्रावार दिग्रस नगरीचे पोलीस पाटील नागेश गंगाधर जोगपेटे व सर्व सन्माननीय सदस्यांनी वारंवार पाठपुरावा केल्यामुळे त्यांच्या पाठपुरव्याला सुद्धा यश मिळालेले दिसून आले. प्रत्यक्षात दिग्रस नगरीमध्ये काम प्रगतीपथावर असून या प्रगतीपथावर असलेल्या कामावर शरद कुमार , आकाश बेलवंशी हे अधिकारी बारीक लक्ष ठेवून असून त्यांच्यासोबत कामावर असलेली टीम तेवढेच महत्त्वाकांक्षी पद्धतीने काम प्रगतीपथावर घेऊन जाण्याचा प्रयत्न करीत आहेत. . सर्विस रोड वरील अधिकारी शरद कुमार व आकाश बेलवंशी यांच्याकडे दैनिक चालू वार्ताचे नांदेड प्रतिनिधी प्रा. यानभुरे जे.एस. यांनी दिग्रस बुद्रुक येथील राष्ट्रीय महामार्ग 50 ला गावांतर्गत जोडणाऱ्या रस्त्यांवर ये जा करण्यासाठी रस्त्यावर स्लुप करून रस्ता वापरण्यासाठी व्यवस्था करून द्यावी अशी मागणी लावून धरली आणि दोन्ही अधिकाऱ्यांनी ते मान्य सुद्धा केली. . दैनिक चालू वार्ता चे नांदेड प्रतिनिधी यानभुरे जयवंत सोपानराव यांनी वारंवार केलेल्या पाठपुराव्यामुळे गावात सर्विस रोड होत असल्यामुळे सर्वत्र त्यांच्या कार्याचे कौतुक केले जात आहे.