
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा. शहरातील नगरपंचायत च्या हद्दीत अलीकडे भरवस्तीत विविध कंपन्यांची मोबाईल टॉवर मोठ्या संख्येने उभारण्यात आली आहे. या टॉवरसंदर्भात कोणतेही निकष पाळण्यात आले नाहीत. नगरपंचायतने अनधिकृत टॉवरवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून – करण्यात आली आहे.
शहरात छत्रपती शिवाजी महाराज चौक, घारे कॉलनी बाजार परिसर व गाव भागात मोठ्या संख्येने विविध मोबाईल कंपन्यांनी सदरील उभारले असून, पूर्वी मोकळ्या जागेत उंच असणाऱ्या या टॉवरने आता, अनेकांच्या बिल्डींगवर, गजबजलेल्या वस्तीमध्ये जागा घेतली आहे. याची संख्या दिवसेदिवस वाढत चालली असून, मात्र या टावरच्या रेंजमुळे नागरिकांचे आरोग्य खरंच धोक्यात आहे का ? हा प्रश्न सर्वांना संभ्रम निर्माण करणारा आहे. हे टॉवर उभारताना पालिकेची परवानगी लागते व याबरोबर अनेक निकष यात लावण्यात आली आहे.
सदरील टावर उभारताना शेजारी राहाणाऱ्यांची पण परवानगी तितकीच जरुरी आहे, शियाय हा , टॉवर भक्कम आहे का, याची रेंज किती आहे, याचे सर्व अनुमान विविध संबंधित विभागाकडून तपासूनच याला परवानगी मिळते. मात्र नगरपंचायतचे कुठलेही निकष न ठेवता केवळ अशा टॉवर उभारणीला परवानगी देत असल्याचा आरोप नाकरिकांकडून केला जात आहे.
याबाबत प्रशासनाने तपासणी मोहीम हाताळत, नगरपंचायत विभागाला याचा जाब विचारावा ही रास्त मागणी जोर धरताना दिसते. शहरात उभारण्यात आलेल्या किती टावरची सर्व निकष पाळत नोंद आहे. याबाबत ही प्रशासनाने तपास क़रत दोषी अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी जोर धरताना दिसते.